Delhi Women Voters : ...म्हणून दिल्ली विधानसभेसाठी 'आप', 'भाजप' अन् 'काँग्रेस'साठी महिला मतदार सर्वाधिक महत्त्वाचा घटक!

Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर निकाल 8 फेब्रुवारी रोजी असणार आहे.
Delhi Women Voters
Delhi Women VotersSarkarnama
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha Election, Political Party and Women Voters : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने आपली तयारी अधिकच वाढवली आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ज्याचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी येईल. अशावेळी सर्वच पक्ष महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. आम आदमी पार्टीत, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांकडून महिला मतदारांसाठी विविध दावे केले जात आहेत. कारण स्पष्ट आहे, दिल्लीतील महिला मतदारांमध्ये एवढी ताकद आहे की त्या कोणत्याही पक्षाला सत्तेच्या सिंहासनावर बसवू शकतात.

दिल्लीत महिला मतदारांची संख्या 46 टक्के आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जेव्हा दिल्ली निवडणुकीची तारीख निश्चित केली होती, तर त्यांनी सांगितले होते की दिल्लीत एकूण 1.55 कोटी मतदार आहेत. ज्यात पुरूष मतदारांची एकूण संख्या 83.89 लाख आणि महिला मतदारांची एकूण संख्या 71.74 लाख आहे. म्हणजेच स्पष्ट आहे की, जर एखादा पक्ष महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला, तर तो पक्ष राजकीय आखाड्यात अधिक मजबुतीने समोर येवू शकतो. दिल्लीत एकूण मतदार - 1.55 कोटी, एकूण महिला मतदार - 71.74 लाख आणि एकूण पुरुष मतदार - 83.89 लाख आहेत.

Delhi Women Voters
Kolkata Rape and Murder Case : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या, तरीही दोषी संजय रॉय फाशीच्या शिक्षेपासून कसा वाचला?

महिलांना पक्ष कसे लुभावत आहेत? -

आम आदमी पार्टी -(Aam Aadmi Party)

-महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यास 2100 रुपये देण्याचे आश्वासन

-महिलाना सरकारी बसमध्ये मोफत प्रवास ही सुविधा सुरू ठेवण्याचे आश्वासन

-संजीवनी योजनेनुसार 60 वर्षांपेक्षा वरील महिलांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात मोफत उपचाराची सोय

भाजप -(BJP)

-महिला समृद्धी योजने अंतर्गत महिलांना दर महिन्यास 2500 रुपये देण्याचे आश्वासन

-स्वयंपाक गॅस सिलिंडरवर 500 रुपयांची सब्सिडी देण्याचे आणि होळी-दिवाळीनिमित्त एक-एक सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन

-गर्भवती महिलांना 21 हजार रुपये देण्याचे आश्वासन अन् न्यूट्रीशनल कीटही देणार

Delhi Women Voters
Delhi Election 2025 : दिल्ली काबीज करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लॅन; असा उडवणार धुरळा

काँग्रेस -(Congress)

-'प्यारी दीदी' योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्यास 2500 रुपये देण्याचे आश्वासन

-सरकार आल्यास 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस देण्याचे आश्वासन

या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 9 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने 9 आणि काँग्रेसने 6 महिलांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

वर्ष 2020मध्ये दिल्लीत पुरुषांची मतांची टक्केवारी 62.6 टक्के होती, तर महिलांची टक्केवारी 62.5 टक्के होती. म्हणजेच हे स्पष्ट आहे की मतदान टक्केवारीतही महिला मजबूत स्थितीत आहेत आणि त्या आपलं सरकार निवडण्यासाठी एक जागरुक नागरिकांची भूमिका निभावत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com