PM Narendra Modi speech : भारतीय वाणिज्य एवं उद्योग महासंघाच्या (FICCI) वार्षिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांचे कान उपटले होते. कर कमी करूनही कमर्चाऱ्यांचे पगार वाढवले नाही, नोकऱ्याही दिल्या नाहीत, असे मोदी म्हणाले होते. त्यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत हा तर मोदींचा कबुलीनामा असल्याचे म्हटले आहे. पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे की, कर कमी केले, पण पगारही वाढले नाहीत आणि नोकऱ्याही दिल्या नाहीत, असा टोमणा काल मोदींनी उद्योजकांना मारला. हा उद्योजकांवरील आरोप नाही तर मोदीजी, तुमचा कबुलीनामा आहे.
भूक एवढी आहे की पोट भरतच नाही, असेही मोदी उद्योजकांना उद्देशून म्हणाले होते. त्यावर राहुल यांनी पलटवार केला. तुमचं बरोबर बोललात, भूक कुणाची आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. विमानतळं, बंदरे, खाणी, जंगलं, वीज, कोळसा, रस्ते... हे सर्व ज्यांच्या नावावर आहे, त्यांनी किती नोकऱ्या निर्माण केल्या?, असा सवाल राहुल गांधींनी केला.
नोटाबंदी आणि सदोष जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही नोकऱ्या निर्माण करणारे छोटे उद्योग आणि एमएसएमई (MSMEs) यांना उद्ध्वस्त केले. प्रामाणिकपणे स्पर्धा करणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठीची संधीच तुम्ही हिरावून घेतली. एकाधिकारशाही नोकऱ्या देत नाही, महागाई वाढवते आणि स्पर्धा संपवते. तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी लूट केली, हे देशाने पाहिले आणि पाहतोय, असी मोदी म्हणाले.
टाळ्या वाजविण्यासारखे काही नाही
कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का?, असा सवाल करत राहुल गांधी म्हणाले, तुमच्या धोरणांमुळे उद्योगपती, छोटे व्यावसायिक, महागाईने त्रस्त गरीब व मध्यमवर्ग आणि बेरोजगार तरुण यांच्यापैकी कुणाकडेही टाळ्या वाजविण्यासारखे काहीही उरलेले नाही. तुमच्या उरलेल्या भक्तांना टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगा, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.