Rajasthan Election Results : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपची दाणादाण; 31 पैकी 21 जागांवर काँग्रेसचा विजय, राज्यभर दिग्गजांना हादरे

Rajasthan Panchayat Election, Rajasthan Zila Parishad Election, Rajasthan Panchayat Samiti Results, BJP Defeat : राजस्थानातील निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. कॅबिनेट मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा पराभव झाला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress Victory news : भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर झाला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपची दाणादाण उडाली असून काँग्रेसने जोरदार पुनरागमन करत भाजपचे टेन्शन वाढविले आहे. खुद्द मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भरतपूर जिल्ह्यातही भाजपचा सुपडा साफ झाला आहे.

राजस्थानतील जिल्हा परिषदेच्या १२७५ वॉर्डांपैकी आतापर्यंत ४०० वॉर्डांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसने २४१ जागांसह मोठी आघाडी घेतली आहे. तर भाजपला केवळ १३९ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. अनेक पंचायत समित्यांवर काँग्रेसने कब्जा केला आहे. आतापर्यंत ७ हजार ५४३ वॉर्डपैकी ६ हजार ७६२ वॉर्डचे निकाल जाहीर झाले आहे.

पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ३ हजार ३५३ जागा जिंकल्या असून भाजपला २ हजार ५ वॉर्ड जिंकता आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपला मोठा झटका बसल्याचे चित्र आहे. राज्यात सत्ता असूनही भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली दिसत नाही.

BJP
जावडेकरांच्या उपस्थितीत झालेला भाजपमध्ये प्रवेश, 'या' नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी

मुख्यमंत्र्‍यांचा गृह जिल्हा असलेल्या भरतपूर जिल्हा परिषदेत ३१ जागांपैकी काँग्रेसने २१ जागांवर विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या असून एका जागेवर हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपने १७ जागांवर विजय मिळविला होता.

निवडणुकीत दिग्गजांना धक्का

राजस्थानातील निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. कॅबिनेट मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा पराभव झाला आहे. खर्रा यांच्या भावाची पत्नीही पराभूत झाली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. काँग्रेसच्या खासदार संजना जाटव यांचे दीर श्रीनिवास जाटव, आमदार रमेश खिंची यांच्या दोन्ही सूना पराभूत झाल्या आहेत.

BJP
BJP news : भाजपला सलग दुसऱ्या दिवशी धक्का; आणखी एका महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा

IAS सुमेर सिंह गुर्जर यांच्या पत्नी पिंकी गुर्जर या भाजपच्या तिकीटावर निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. पण त्यांनाही पराभवाचा झटका बसला आहे. भाजपचे आमदार अजय सिंह किलक यांच्या भावजय मनदीप चौधरी पराभूत झाल्या आहेत. माजी कॅबिनेट मंत्री शंभूसिंह खेतासह यांच्या पत्नीसह सुनेचा पराभव झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.