Dharmendra Pradhan resignation demand : देशभरात विद्यार्थी अन् तरुणाईचा रोष वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मोठी घोषणा केली. पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांमधील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक्ट कोर्टाची घोषणा त्यांनी केली. मात्र, या घोषणेनंतरही सरकारसमोरील संकट कायम असणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह कॉक्रोच जनता पार्टीने मोदींच्या या घोषणेनंतर सरकारचे टेन्शन वाढविणारे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियातून ही घोषणा केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यावर लगेच पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्हीच आपल्या युवकांच्या भवितव्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे. तुम्ही केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्णपणे कब्जाच केला नाही तर ती संपवून टाकण्याचे प्रयत्न केले. त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या स्पष्ट असल्याचे सांगत म्हटले आहे की, 'धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात करा.' राहुल यांनी या तीन मागण्या करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान होणार, हे स्पष्ट आहे.
माय नेम इज नथिंग!
पंतप्रधान मोदींच्या घोषणेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एकाच शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियात पोस्ट करताना पहिल्याच ओळीत 'नथिंग इज मोअर इम्पॉर्टंट दॅन द वेल्फेअर अॅन्ड फ्यूचर ऑफ अवर यूथ' असे म्हटले होते. त्यावरून दीपके यांनी सोशल मीडियात प्रधान यांचा फोटो टाकत त्यावर 'हाय, माय नेम इज नथिंग', असे म्हटले आहे.
दीपके यांच्या 'नथिंग' या शब्दामध्ये मोठा अर्थ दडला आहे. दीपके यांनी सुरूवातीपासूनच प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, अद्याप सरकारने त्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. राजीनाम्याशिवाय माघार नाही, अशी दीपके यांनी भूमिका आहे. सरकार त्यांना वाचवत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.