PM Modi And Sunita Williams sarkarnama
देश

Pm Modi : 'तुम्ही आमची आन, बान आणि शान...', पंतप्रधान मोदींच्या सुनीता विल्यम्स यांना 'खास' शुभेच्छा; पत्रात काय काय म्हटलं..?

Pm Modi to Sunita Williams : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांची 'ग्रह वापसी' झाली आहे. आज (ता.19) एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या मदतीनं, सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आणि इतर दोन अंतराळवीर अखेर यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. यामुळे जगभरात या अंतराळवीरांना दाखवलेल्या धैर्यावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Aslam Shanedivan

Navi Delhi News : गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ तांत्रिक बिघाडामुळे आडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांची 'ग्रह वापसी' झाली आहे. तब्बल 286 दिवसांनंतर त्यांच्यासह तीन अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित आगमन बुधवारी (ता.19) पहाटे झाले. यावरून जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनीता विल्यम्स यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुनिता विलियम्स यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विलियम्स यांचं स्वागत करताना, एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी सुनिता विलियम्स यांना वेलकम बॅक म्हटलं आहे. तसेच त्यांच्यासह इतर अंतराळवीरांच्या सहास आणि धैर्याचं कौतुक केलं आहे. कौतुक करणारे पत्र मोदींनी लिहलं आहे. या पत्रात त्यांनी, तुम्ही आमची आन, बान आणि शान असून तुमच्या कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपल्या पत्रातून 1.4 अब्ज देशवासियांच्या भावना व्यक्त करताना, तुम्ही आमच्यापासून हजारो मैल जरी दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ आहात. हे पत्र सुनिता यांना अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांच्यामार्फत पोहोचवण्यात आले. ज्यांना पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात भेटले होते.

ट्रेलब्लेझर आणि आयकॉन

तसेच सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आणि इतर दोन अंतराळवीरांनी या कालावधीत 121 मिलियन मैल म्हणजे 195 मिलियन किमीचा हा प्रवास केले आहे. याचेही कौतुक पंतप्रधान मोदींनी केलं असून त्यांनी सुनिता विलियम्स यांना ट्रेलब्लेझर आणि एक आयकॉन असं संबोधलं आहे.

मिशन आठ दिवसांचे परतीला लागले 9 महिने

सुनिता आणि क्रू मेंबर बुच विल्मोर यांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी पृथ्वी सोडली होती. बोइंगच्या स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून उड्डान त्यांनी केलं होतं. तर ज्या कारणासाठी त्या गेल्या होत्या ते फक्त 8 दिवसांचे होते. पण स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्या तब्बल 9 महिने आतंराळस्थानकात अडकल्या. पण आता तब्बल 286 दिवसांनंतर त्यांच्यासह इतर अंतराळवीर सुखरूप परतले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT