Sunita Williams Return : वेलकम बॅक सुनिता विलियम्स! 9 महिन्यांनी पृथ्वीवर सुखरूप 'ग्रह वापसी'

NASA Sunita Williams SpaceX Crew-9 Return : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर यांचे 9 महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप पृथ्वीवर आगमन.
Sunita Williams
Sunita WilliamsSarkarnama
Published on
Updated on

Sunita Williams News : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर यांचे आज (ता.19) पहाटे पृथ्वीवर आगमन झाले. भारतीय वेळेनुसार त्यांना घेऊन येणारे यान 3 वाजून 27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर किनारपट्टीवर स्प्लॅशडाउन झाले.

फक्त आठ दिवसांच्या कामगिरीवर गेलेल्या सुनिता विल्यम्स 9 महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात अडकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आगमनाकडे जगाचे लक्ष लागले होते. सुनिता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर यांच्या आगमनाने अमेरिकेतच नव्हे तर भारतातील त्यांच्या मुळ गावी उत्साहाचं वातावरण आहे.

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. त्याचे पुनरागमन स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून झाले. या अंतराळयानातून 17 तासांच्या प्रवासानंतर हे दोघे पृथ्वीवर परतले.

आज पहाटे 3.27 वाजता ड्रॅगन अंतराळयान कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात कोसळले. यानंतर, अंतराळयानातील सर्व प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी नासाकडून अंतराळवीरांच्या परतीचे थेट प्रक्षेपण करण्यासह त्याबद्दल अपडेट्स दिल्या जात होत्या.

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते. दोघेही फक्त एका आठवड्यासाठी गेले होते पण अंतराळयानातून हेलियमची गळती झाल्यामुळे आणि वेग कमी झाल्यामुळे त्यांना नऊ महिने अंतराळ स्थानकावर राहावे लागले. सुनीता विल्यम्सला घेऊन जाणारे अंतराळयान सकाळीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून अनडॉक झाले.

Sunita Williams
Sunita Williams : NASA साठी जिवाची बाजी लावणाऱ्या सुनीता विल्यम्स यांना अमेरिका सरकार किती पगार देतं?

सुनिता विलियम्स यांची 'ग्रह वापसी'. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या मदतीनं, अमेरिकी सरकार आणि नासाच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश लाभलं असून, नासासाठी काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स, त्यांचे सहकारी बुच विल्मोर आणि इतर दोन अंतराळवीर अखेर पृथ्वीवर यशस्वीरित्या परतले आहेत.

Sunita Williams
Dinvishesh 10 December : अमर्त्य सेन यांना नोबेल; सुनीता विल्यम्सची अंतराळात भरारी अन् बरंच काही

ड्रॅगन कॅप्सूल पॅराशूटद्वारे समुद्रात लँड झाल्यानंतर 10 मिनिटे त्याचं सिक्युरीटी चेक करण्यात आले. कॅप्सूल थेट उघडता येत नाही. आतील आणि बाहेरील तापमान समान होणं गरजेचं आहे. कॅप्सूल पृथ्वीरील वातावरणात प्रवेश करतं, त्यावेळी तापमान जास्त वाढतं, त्यामुळेच त्याला समुद्रात उतरवले जाते अन् सामान्य तापमान केलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com