New dehali News : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला होत असून दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत.
त्यातच रविवारी भाजपने संसद परिसरात त्यांच्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. पण कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी संसद परिसरातील दृश्य पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'साधेपणा' पाहून भाजप खासदार अवाक् झाले. पहिल्या रांगेचा मान सोडून बसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
भाजप (BJP) व मित्रपक्षांच्या खासदारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रविवारी पार पडलेल्या पहिल्या सत्राला पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, जेपी नड्डा उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि खासदार देखील सहभागी झाले होते. या कार्यशाळेप्रसंगी पंतप्रधान मोदींना शेवटच्या रांगेत बसलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
रविवारी दुपारी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi ) पोहोचले. यावेळी ते नेहमीप्रमाणे पहिल्या रांगेत बसतील असे सर्वाना वाटत होते. मात्र सभागृहात आल्यानंतर ते एकदम शेवटच्या रांगेत बसले. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार संगीता बलवंत यांनी एक्सवर कार्यशाळेचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात त्या शेवटच्या रांगेत बसलेल्या दिसत आहेत.
भाजप खासदारांसाठी जीएसटीच्या स्लॅबबद्दल माहिती देण्यात येत आहे. जीएसटीतील सुधारणांमुळे सर्वसामान्यांवरील करांचं ओझं कमी होईल, असा विश्वास सरकारला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आशा सरकारला आहे. वस्तू आणि सेवांवरील करांमध्ये कपात झाल्याने अनेक उत्पादनांच्या किमती घटतील. त्यामुळे सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढेल, असे भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना वाटत आहे.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मंगळवारी होत आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भाजपकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे. 9 सप्टेंबरला म्हणजेच येत्या मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.