Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील पुन्हा शिवनेरीवर नतमस्तक होणार! उद्या रुग्णालयातून सुट्टी, पुढचा प्लॅनही सांगितला..

Maratha reservation activist Manoj Jarange Patil will once again bow at Shivneri : माझ्या राजाचे किती सामर्थ्य आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरील मातीची ताकद काय आहे? हे मी अनुभवले आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला, आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला जाण्यापुर्वी शिवनेरी किल्ल्याची माती कपाळावर लावली होती. माझ्या राज्याची काय ताकद आहे, हे मला जगाला दाखवून द्यायचे आहे. उद्या रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर पुन्हा मला शिवनेरीवर थेट शिवाई मंदिरापर्यंत जायचे आहे. पुन्हा शिवनेरीची माती कपाळावर लावायची आहे, अशी इच्छा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

मुंबईतील बेमुदत उपोषण यशस्वीरित्या पाचव्या दिवशी संपवल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) तातडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून उद्या दुपारी त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर काय काय करणार? याचा प्लॅनच जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर सांगितला.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर सगळ्यात आधी गावात अंतरवालीत जाणार आहे. सगळ्या ग्रामदैवतांचे दर्शन आणि गावकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) या लढाईत गावाने मला भक्कम साथ दिली आहे. दुपारी साडेबारा वाजता मी गावात जाईल. त्यानंतर दर्शन आणि गावातल्या लोकांच्या भेटी घेतल्यानंतर थोडावेळ घरी जाईन आणि दुपारी चार वाजता लगेच नारायण गडावर दर्शनासाठी जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News : 'धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये'!

मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी मुंबईला निघालो तेव्हा मी शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन किल्ल्याची माती कपाळावर लावली होती. माझ्या राजाचे किती सामर्थ्य आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरील मातीची ताकद काय आहे? हे मी अनुभवले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याला जे यश मिळाले, ते माझ्या राज्यामुळे. त्यामुळे माझी पुन्हा शिवनेरीवर थेट शिवाई मंदिरापर्यंत जाण्याची इच्छा आहे. मुंबईला जातांना मी पायथ्यापर्यंत गेलो होतो.

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation News : मनोज जरांगे यांना कायदा अन् शासन आदेश यातला फरकच कळत नाही! संजय लाखे पाटील यांची टीका

सध्या मला गडावर चढणे शक्य होणार नसल्याने काही दिवसांनी मी निश्चित जाणार आहे. माझ्या राजाचे सामर्थ्य काय आहे? हे मला जगाला दाखवून द्यायचे आहे. पुन्हा शिवनेरी किल्ल्याची माती माथ्यावर लावून महाराजांचे आणि शिवाई मंदिराचे दर्शन घ्यायचे असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com