Narendra Modi on International Yoga Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.२० जून) रात्री उशिरा अमेरिकेत पोहोचले. अमेरिकेत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावर उपस्थित भारतीय लोकांनी मोदींच्या स्वागतासाठी घोषणाबाजी केली.
लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत तिरंगा फडकवताना दिसत होते. पंतप्रधान मोदींनी भारतीयांशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि हस्तांदोलन केले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
योग दिनानिमित्त केलेल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, "आपल्या ऋषीमुनींनी योगाची व्याख्या करताना सांगितले आहे की, जो जोडणारा आहे तो योग. त्यामुळे योगाचा हा प्रसार म्हणजे संपूर्ण जग एका कुटुंब आहे. "
"वसुधैव कुटुंबकम् या कल्पनेचा विस्तार आहे. योगाचा विस्तार म्हणजे वसुधैव कुटुंबकमच्या भावनेचा विस्तार. त्यामुळे या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G - 20 शिखर परिषदेची थीमही एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य अशी ठेवण्यात आली आहे. आज जगातील करोडो लोक वसुधैव कुटुंबकम या योगाच्या संकल्पेनेवर एकत्र योग करत आहेत," असेही मोदी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजता मी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या योग कार्यक्रमात सहभागी होणार आहे. भारताने केलेल्या आवाहनाला 180 हून अधिक देशांचे एकत्र येणे ऐतिहासिक आहे. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधरण सभेत योग दिनाचा प्रस्ताव आला. तेव्हा त्याला विक्रमी संख्येने देशांनी पाठिंबा दिला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही जागतिक चळवळ बनली आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.