Chitra Wagh On NCP : '' उशिरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेसला जाग आली असून मलिक...'' चित्रा वाघांचा खोचक टोला

NCP Vs BJP : '' मलिकांना जागतिक गद्दार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...''
Chitra Wagh On NCP
Chitra Wagh On NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai: '' राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय योग्य दिवशी 'जागतिक गद्दार दिन' साजरा केला याबद्दल त्यांचे नितांत आभार आहे. उशिरा का होईना राष्ट्रवादीला उपरती झाली आणि त्यांनी माजी मंत्री नवाब मलिकांचा वाढदिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला. नवाब मलिकांना जागतिक गद्दार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा'' अशी बोचरी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या वतीने आज शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या गद्दारीला एक वर्ष पूर्ण झाल्याने आंदोलन करण्यात येत आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली. वाघ म्हणाल्या, उशिरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेसला जाग आली असून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वाढदिवसानिमित्त हा गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे.

Chitra Wagh On NCP
Chitra Wagh On Supriya Sule : सत्तेचा 'स्ट्राईक रेट' काढत चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा; म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय योग्य दिवशी जागतिक गद्दार दिन साजरा केला याबद्दल त्यांचे नितांत आभार आहे. उशीरा का होईना राष्ट्रवादीला उपरती झाली आणि त्यांनी नवाब मलिकां(Nawab Malik)चा वाढदिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला. नवाब मलिकांना जागतिक गद्दार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंही वाघ यांनी म्हटलं आहे.

वाघ नेमकं काय म्हणाल्या..?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात येत असलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार नवाब मलिक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत असेल. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या कडून कुर्ला येथील जमीन खरेदी केल्या प्रकरणात अटकेत आहे.

Chitra Wagh On NCP
Satej Patil News : राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचाही विरोधी पक्षनेतेपदावर दावा; सतेज पाटलांसाठी वेणुगोपाल यांना साकडं

राष्ट्रवादीने उशिरा का होईना पण नवाब मलिक यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन केले आहे अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.