PM Modi's Strategic Visit to Adampur Airbase : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर येथील हवाई दलाच्या एअरबेसला अचानक भेट दिली. हा एअरबेस उध्वस्त केल्याचा खोटा प्रचार पाकिस्तानकडून करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी थेट या एअरबेसवर येऊनच पाकला आरसा दाखवला. मोदींनी जवानांसोबत संवाद साधतानाच मिग-29 हे लढाऊ विमान आणि शक्तीशाली एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमचे जगालाही दर्शन घडवले.
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर जाणीवपूर्वक जाऊन एकप्रकारे पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराची रणनीती उध्वस्त केली आहे. हा एअरबेस भारतीय हवाई दलाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एअरबेस मानला जातो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आदमपूरला येत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
आदमपूर एअरबेसवर लष्कराच्या विमानाने सकाळी दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींनी पाकला पहिला झटका दिला. त्यानंतर त्यांनी एअरबेसवर जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या आजूबाजूला मिग-29 विमान आणि एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम दिसत होती. पाकचे ड्रोन आणि मिसाईल हल्ले परतवून लावण्यात या सिस्टीमची महत्वाची भूमिका राहिली आहे.
मागील आठवड्यात पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसला टार्गेट करण्यात आले होते. ड्रोन आणि मिसाईलचा जोरदार मारा करण्यात आला. पण भारतासाठी सुदर्शन चक्र ठरलेल्या एस-400 या सिस्टीमने पाकचे हल्ले हवेतच उध्वस्त केले. यश न मिळाल्याने बिथरलेल्या पाकने फेक व्हिडीओच्या माध्यमातून खोटी माहिती पसरविण्यास सुरूवात केली.
आदमपूर विमानतळावरील एस-400 ही यंत्रणा पाकने उध्वस्त केल्याचा खोटा प्रचार पाकने केला होता. त्यासाठी मातीचा ढीग असलेली सॅटेलाईट इमेज दाखविली जात होती. पण पाकचा हा दावा किती खोटा आहे, हे भारतीय लष्कराकडूनही स्पष्ट करण्यात आले. आज पंतप्रधानांनी थेट एअरबेसवर जात पाकचा खोटारडा चेहरा जगासमोर आणला. त्यांच्या या कृतीने पाकचा प्रोपोगंडा उघडकीस आला. आदमपूर एअरबेस सुस्थितीत असून पुन्हा पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचा संदेश पंतप्रधानांनी पाकला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.