Jammu Kashmir Encounter : शोपियामध्ये दहशतवाद्यांना घेरलं! तीन दहशतवादी ठार; जंगलात गोळीबार सुरु

J&K Shopian Terrorist Encounter: मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांना घेरले आहे, तीन दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
J&K Shopian Terrorist Encounter
J&K Shopian Terrorist EncounterSarkarnama
Published on
Updated on

जम्मू-कश्मीरमधील शोपिया मध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये गोळीबार झाला. सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. दहशतवाद्यांना घेरले आहे, तीन दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लश्कर-ए-तैयबा या संघटनेशी ते संबधीत आहे. जंगलात हा गोळीबार सुरु आहे.

शाहिद अहमद असे ठार झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव आहे. सुरक्षा रक्षकांनी घेरलेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समजते. शुकरू केलर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सडेतोड उत्तर देण्यात येत आहे.

J&K Shopian Terrorist Encounter
BrahMos NG Missile: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारतानं विकसीत केलं जगातील सर्वाधिक शक्तीशाली ब्रह्मोस एनजी मिसाईल

तीन संशयीत दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील तीन संशयीत दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. जम्मू -काश्मीर परिसरात अनेक ठिकाणी ही छायाचित्र लावण्यात आली आहेत. त्यांचा पत्ता देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचललं आहे. ते आदमपुर एयरबेस येथे रवाना झाले आहेत. सध्या ते जवानांनी संवाद साधत आहेत.


PM Modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor
PM Modi visits adampur airbase boosts morale of armed forces after operation sindoor Sarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com