Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : भारत सध्या मिशन मोडमध्ये! अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी सांगितला 2047 पर्यंतचा रोडमॅप, म्हणाले...

Economic Survey 2024-25 Live Updates : New Delhi News, 31 Jan : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्ण बजेट उद्या संसदेत सादर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरूवातीला महालक्ष्मीला वंदन केलं.

Jagdish Patil

New Delhi News, 31 Jan : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्ण बजेट (Budget 2025) उद्या संसदेत सादर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुरूवातीला महालक्ष्मीला वंदन केलं.

देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गी कुटुंबावर महालक्ष्मीची कृपा रहावी, असं म्हणत मोदींनी (PM Narendra Modi) बोलायला सुरूवात केली. यंदाचं बजेट हे विकसित भारताच्या वाटचालीतील एक महत्वाचं बजेट असेल. 2047 ला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील, तेव्हा हे बजेट एक नवीन विश्वास आणि ऊर्जा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जनतेने मला तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. उद्या सादर होणार बजेट हे या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं पूर्ण बजेट असेल. मी विश्वासाने सांगतो 2047 साली स्वातंत्र्याची शंभर वर्ष होतील. त्यासाठी हे बजेट एक नवीन विश्वास निर्माण करेल. तसंच देश विकसित करण्याचा संकल्प 140 कोटी देशवासियांच्या सार्वजनिक प्रयत्नाने पूर्ण होईल, असंही ते यावेळी म्हणाले.

भारत सध्या मिशन मोडमध्ये

तर भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भौगोलिक सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती असो या सर्व क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. अनेक ऐतिहासिक बिलांवर या सत्रात चर्चा होईल आणि त्यानंतर राष्ट्राची ताकद वाढवण्यासाठीचे कायदे बनवले जातील. प्रत्येक नारीला सन्मान देण्यासाठी समान अधिकार मिळावे यासाठी या सत्रात अनेक निर्णय घेतले जातील, असे सूचक संकेत त्यांनी यावेळी दिले.

तर यावेळी त्यांनी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आहे. सध्या जे तरूण 20 ते 25 वर्षाचे आहेत. ते 45 वर्षाचे होतील तेव्हा ते विकसित भारताचे (Developed India) सर्वाधिक लाभार्थी असतील, असा दावाही पंतप्रधान मोदींनी केला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार अनेक नवीन बिल पास करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT