PM Narendra Modi on X Sarkarnama
देश

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा ‘X’ वर नवा रेकॉर्ड; राहुल गांधींसह इतर नेते जवळपासही नाहीत...

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नवा रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या X वर पंतप्रधा नोदींचे तब्बल 10 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर बड्या नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षाही मोदींचे फॉलोअर्स अधिक आहेत.

भारतासह जगभरात मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. जगातील नेत्यांमध्ये मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन वर्षांत मोदींच्या फॉलोअर्समध्ये तब्बल तीन कोटींची भर पडली आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा तिपटीहून अधिक मोदींची सोशल मीडियात लोकप्रियता आहे.

भारतातील नेत्यांचा विचार केल्यास राहुल गांधी यांचे एक्सवर 26.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांच्यापेक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंचित पुढे असून त्यांना 27.5 लोक फॉलो करतात. तसेच अखिलेश यादव यांचे 19.9, ममता बॅनर्जी यांचे 7.4, लालू प्रसाद यादव यांचे 6.3, तेजस्वी यादव 5.2 आणि शरद पवार यांचे 2.9 फॉलोअर्स आहेत.

इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या एकूण फॉलोअर्सपेक्षा मोदींचे फॉलोअर्स अधिक असल्याचा दावा भाजपने केला आहे. जगातील इतर नेत्यांमध्येही मोदींचो लोकप्रियता अधिक आहे. जो बायडेन यांच्यासह दुबईचे शासक एचएच शेख मोहम्मद यांचे फॉलोअर्स अनुक्रमे 38.1 आणि 11.2 मिलियन आहेत.

जगभरातील काही प्रसिध्द खेळाडूंच्या तुलनेतही मोदी खूप पुढे आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीचे एक्सवर 64.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्यूनियर 63.6, अमेरिकेन बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्सचे 52.9 फॉलोअर्स आहेत. तसेच जगभरात प्रसिध्द असलेले टेलर स्विफ्ट यांचे 95.3, लेडी गागाचे 83.1 आणि किम कार्दशियांचे 75.2 फॉलोअर्स आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT