Yodi Adityanath : लोकसभेतील झटक्यानंतर योगींचा पहिलाच बूस्टर डोस; म्हणाले, बॅकफूटवर...

Lok Sabha Election Uttar Pradesh BJP Assembly Election 2027 : लोकसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला. पक्षाला 80 पैकी केवळ 33 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे भाजपला केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर रविवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांसी थेट संवाद साधला.

लखनऊ येथे लोकसभा निवडणुकीनंतर रविवारी प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक झाली. या बैठकीत योगींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी मतांचा टक्का कमी झाला नसल्याचे योगींनी यावेळी सांगितले. त्यामुळे बॅकफूटवर जाऊ नका, असा धीरही योगींनी कार्यकर्त्यांना दिला.

Yogi Adityanath
BJP Vs Congress : पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ची बाजी; भाजपचे किती नुकसान? समजून घ्या गणित

योगी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2017, 2019 आणि 2022 च्या निवडणुकीत विरोधकांना पराभूत केले आहे. या निवडणुकांमधील मतांचा टक्का भाजपने 2024 मध्येही कायम ठेवला आहे.

उत्तर प्रदेशात पुढील काही दिवसांत दहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभेनंतर भाजपची ही दुसरी परीक्षा ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर योगींनी कार्यकर्त्यांना एकजुटीने प्रचाराला लागण्याचे आवाहन केले. भाजप सर्व दहा जागांवर विजय मिळवेल. पण त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला या मोहिम यावे लागले. आपल्याला विजयाची मोहिम पुढेही सुरू ठेवायची आहे, असे योगी म्हणाले.

Yogi Adityanath
BJP President Election : भाजपला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष; अशी होणार निवड...

नुकत्याच सात राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला 13 पैकी 10 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. या निवडणुकीत भाजपला फटका बसला असून केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे योगींच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

विधानसभेची तयारी

उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ब्लॉक प्रमुख, अध्यक्ष, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष आमदार, खासदार सर्वांनीच संघटन धिक मजबूत करून समन्वय ठेवण्याची गरज आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्यांच्या पाठिशी उभे राहून विजय मिळवायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com