BJP Vs Congress : पोटनिवडणुकीत ‘इंडिया’ची बाजी; भाजपचे किती नुकसान? समजून घ्या गणित

Assembly Bypoll Result India Alliance NDA Congress : देशातील सात राज्यांत 13 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघांपैकी 10 ठिकाणी इंडिया आघाडीला विजय मिळाला आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपने आपले काहीच नुकसान झाले नाही, असा दावा केला आहे.

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी पश्चिम बंगाल वगळता भाजपच्या जागा कमी झालेल्या नाहीत. उलट हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशात एक-एक जागा वाढल्याचे म्हटले आहे. बंगालमध्ये भीतीच्या वातावरणाखाली निवडणूक झाली, असे त्यांनी म्हटले आहे.

मालवीय यांच्या विरोधकांवरील पलटवारानंतर या निवडणुकीत नेमके कुणाचे किती नुकसान झाले, कुणाचा किती फायदा झाला, हे पाहिल्यास भाजपचा दणका बसल्याचे स्पष्टपणे दिसते. हिमाचल प्रदेश, बंगालमध्ये भाजपचे अनुक्रमे दोन व चार असे एकूण सहा उमेदवार पराभूत झाले आहेत.

BJP, Congress
BJP President Election : भाजपला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष; अशी होणार निवड...

एकूण 13 जागांवर झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीला 10 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये आघाडीच्या पाच जागांमध्ये वाढ झाली आहे. तर भाजपला दोन जागा मिळाल्या असून दोन जागांचे नुकसान झाले आहे. एक मतदारसंघ अपक्षांकडे गेला आहे.

पश्चिम बंगाल - राज्यात चार जागांवर निवडणूक झाली. सर्व जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी तीन जागांवर याआधी भाजपचे आमदार होते. त्यामुळे भाजपला तीन जागांचे नुकसान झाले आहे.  

BJP, Congress
Gaurav Gogoi : काँग्रेसकडून गौरव गोगोई यांच्यावर मोठी जबाबदारी; संसदेत राहुल गांधींना देणार साथ

हिमाचल प्रदेश – तीन जागांपैकी दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर भाजपला एक जागा मिळाली आहे. भाजपसह काँग्रेसला या निवडणुकीत अनुक्रमे एक व दोन जागांचा फायदा झाला आहे. हे तिन्ही मतदारसंघ यापूर्वी अपक्षांकडे होते. ते ही निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढले.

उत्तराखंड – उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राज्यात एक अधिकचा जागा काँग्रेसला मिळाली आहे. भाजपचे काहीच नुकसान झालेले नाही.

मध्य प्रदेश – एकमेव जागेवर भाजपला विजय मिळाला आहे. हा मतदारसंघ आधी काँग्रेसकडे होता. त्यामुळे काँग्रेसचे एका जागेचे नुकसान झाले आहे.

बिहार – राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचा दणका बसला आहे. पोटनिवडणुकीत अपक्षाने विजय मिळवत जेडीयूला झटका दिला. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक आमदार कमी झाला.

तमिळनाडू – एका जागेवर झालेल्या मतदानात अपेक्षेप्रमाणे डीएमकेचा उमेदवार विजयी झाला. ही जागा आधीच याच पक्षाकडे होती.

पंजाब – पंजामध्येही एका जागेवर मतदान झाले असून आपचा विजय झाला आहे. ही जागा आधीही आपकडेच होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com