PM Narendra Modi, Mary Millben Sarkarnama
देश

PM Narendra Modi : ...हे नातं अधिक घट्ट होण्यासाठी मोदीच हवेत! हॉलिवूड अभिनेत्रीकडून पंतप्रधानांचं कौतुक

Rajanand More

India US Relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अनेकांनी मोदींविषयीची उघडपणे आपली मतं व्यक्त केली आहेत. हॉलिवूड अभिनेत्री व गायिका मेरी मिलबेनही मोदींची चाहती असून तिने भारतात पुन्हा मोदींची सत्ता येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.

अमेरिकेतील अनेक जणांना पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत असे वाटते. अमेरिका आणि भारतातील नाते अधिक मजबूत होण्यासाठी मोदी हेच सर्वात चांगले नेतृत्व असल्याचेही मिलबेनने म्हटले आहे.

भारतात (India) एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत. तसेच अमेरिकेतील (America) अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये नियोजित आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्यातच थेट लढत होण्याची शक्यता आहे.

मेरी मेलबेन (Mary Millben) ही ट्रम्प यांची चाहती आहे. मागील वर्षी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेच्या दौऱ्या असताना तिने एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रगीत गायले होते. त्यानंतर तिचे भारतातही लोकप्रिय झाली.

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मिलबेन म्हणाली, मी मोदींची समर्थक असल्याचे संपूर्ण भारताला माहिती आहे. अमेरिकेतही पंतप्रधान मोदींचे खूप चाहते आहेत. तेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असेत त्यांना वाटते.

तेच भारतासाठी खूप चांगले नेते आहेत. भारत आणि अमेरिकेसाठीच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. भारत आणि अमेरिकेतील नाते आणखी मजबूत करण्यासाठी तेच चांगले नेते आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिलबेन हिने भारतीयांना मतदान करण्याचेही आवाहन केले. ती म्हणाली, ही महत्वाची निवडणूक असल्याने सर्वांनी मतदान करावे. ही आपली जबाबदारी आहे. तुमचा आवाज पोहचवण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकांनी आपला आवाज पोहचवण्याची हीच वेळ आहे. देशात बदल घडवण्यासाठी आपल्या ताकदीचा उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT