BJP Election Campaign : भाजपकडून 'स्मार्ट' प्रचारातही विरोधकांना धोबीपछाड; गुगल जाहिरातींवर उडवले सर्वाधिक 19 कोटी...

Google Ads : मागील वर्षभरात सर्वाधिक खर्च भाजपने केला आहे.
Rahul Gandhi, Narendra Modi, K. Chandrashekhar Rao
Rahul Gandhi, Narendra Modi, K. Chandrashekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : विधानसभा असो की लोकसभा निवडणुका... सध्या तरी कोणताही पक्ष भाजपसारखा नियोजनबद्ध आणि स्मार्ट प्रचार करताना दिसत नाही. सोशल मीडियापासून गुगलपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपने प्रचारात आघाडी घेतलेली असते. आगामी लोकसभा निवडणुकीतही असाच स्मार्ट प्रचार सुरू राहणार असल्याची चुणूक 2023 मध्ये दिसून आली आहे. यावर्षी भाजपने केवळ गुगलवरील जाहिरातींसाठी तब्बल 19 कोटी रुपये खर्च केले आहेत.

भाजपने (BJP) गुगलवरील जाहिरातींमध्ये काँग्रेससह सर्व पक्षांना मागे टाकले आहे. Google Ads पारदर्शकता डेटानुसार, भाजपने 2023 मध्ये 19 कोटी रुपये जाहिरातींसाठी मोजले आहेत. त्यामध्ये काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) कालावधीत सर्वाधिक खर्च झाला आहे. पक्षाच्या प्रचारांच्या जाहिरातींसह मोदी सरकारने (Modi Government) केलेल्या कामांच्या जाहिरातींचाही समावेश होता.

Rahul Gandhi, Narendra Modi, K. Chandrashekhar Rao
Big Breaking : मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अर्धा दिवस सुटी

सर्वात जास्त खर्च व्हिडीओवर म्हणजे यू-ट्यूबवर करण्यात आला आहे. कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीदरम्यान गुगल जाहिरातींसाठी सर्वाधिक 7.2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांसाठी एकत्रितपणे 7 कोटी 71 लाख रुपये खर्च केले. तेलंगणामध्ये मात्र के. चंद्रशेखर राव यांनी भाजपला मागे टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केसीआर यांच्या पक्षाने गुगलवर तब्बल 12.1 कोटींच्या जाहिराती केल्या. मागील वर्षभरात गुगलवर केलेल्या खर्चात भाजपनंतर केसीआर यांचा क्रमांक लागतो. काँग्रेसने (Congress) केलेला एकूण खर्च केवळ 4.59 कोटी आहे. त्यातही सर्वाधिक खर्च कर्नाटकमध्ये केल्याचे दिसते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये केलेला खर्च अत्यंत नगण्य होता.

दरम्यान, भाजपकडून 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा प्रचारात प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात केली. भाजपने स्मार्ट प्रचारात गाठलेली मजल कोणत्याही पक्षाला जमलेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपकडून गुगल जाहिरातींचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जाईल, यात कोणतीही शंका नाही.

R...

Rahul Gandhi, Narendra Modi, K. Chandrashekhar Rao
Mayor Election : महापौर निवडणुकीत ट्विस्ट, अधिकारीच पडले आजारी; 'ऑपरेशन लोटस फेल'...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com