India Alliance : ‘इंडिया’चे साईड इफेक्ट्स; बड्या नेत्याची ‘आप’ला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाणार

LokSabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा...
Ashok Tanwar
Ashok TanwarSarkarnama
Published on
Updated on

Haryana News : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची जागावाटपावरून चर्चा सुरू असताना आता त्याचे साईड इफेक्ट्सही दिसू लागले आहेत. हरियानामध्ये या आघाडीचा पहिला फटका आम आदमी पक्षाला बसला आहे. काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने एका बड्या नेत्याने आपला रामराम ठोकला आहे. हा नेता लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

हरियाना आपचे नेते अशोक तंवर (Ashok Tanwar) यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते आपच्या इलेक्शन कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे निवडणुकीआधी आपला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. येत्या शनिवारी तंवर हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत (Congress) आपची होत असलेल्या आघाडीमुळे मी पदावर राहू शकत नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे तंवर यांनी स्पष्ट केले आहे. 

Ashok Tanwar
Big Breaking : मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अर्धा दिवस सुटी

तंवर यांनी बदलले चार पक्ष

तंवर हे मूळचे काँग्रेसचे आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीनंतर आणि हरियाना विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. पुढे त्यांनी 2021 मध्ये अपना भारत मोर्चा हा पक्ष काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांतच तंवर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये आणि नंतर 2022 मध्ये आपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली. पण पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच चंदीगड महापौर निवडणुकीत आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि तंवर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रातही नमूद केले आहे.

तंवर हे आता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. त्यांना सिरसा किंवा अंबाला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

R...

Ashok Tanwar
BJP Election Campaign : भाजपकडून 'स्मार्ट' प्रचारातही विरोधकांना धोबीपछाड; गुगल जाहिरातींवर उडवले सर्वाधिक 19 कोटी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com