Narendra Modi Speech On Congress Party  Sarkarnama
देश

Narendra Modi Speech : देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने संघराज्य शिकवू नये; मोदींचा निशाणा!

Chetan Zadpe

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणलेल्या आभार प्रस्तावावर भाषण केले. मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले, 'संविधानाच्या इतक्या वर्षांच्या प्रवासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर राष्ट्रपतींच्या भाषणालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या उज्वल भविष्याचा विश्वास व्यक्त केला आहे आणि भारतातील कोट्यवधी लोकांची क्षमता अगदी मोजक्या शब्दात आणि अतिशय प्रभावीपणे सभागृहात मांडली आहे. तसेच, यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

'सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला' -

नरेंद्र मोदी म्हणाले, 'ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला. ज्या काँग्रेसने लोकशाही पद्धतीने अनेक सरकारे बरखास्त केली. ज्या काँग्रेसने देशाची राज्यघटना आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखली नाही. ज्या काँग्रेसने वर्तमानपत्रांना टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. तो काँग्रेस पक्ष आम्हाला संघराज्यावर ज्ञान देत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरंटी नाही, आपल्या धोरणाची गॅरंटी नाही, असा काँग्रेस पक्ष मोदींच्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात देश का विकास का खुंटला? देशाचा विकासापासून दूर का नेलं? असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही' -

पंतप्रधान म्हणाले, 'आजही तुम्ही ऐकण्याच्या तयारीने नाही आलात. पण तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. आमच्या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. देशातील जनतेचं आशीर्वाद आहे. 'लोकशाहीत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि ऐकण्याची जबाबदारी आमची आहे. आज जे काही घडले आहे ते मी देशासमोर ठेवले पाहिजे. माझा विश्वास पक्का झाला आहे की, काँग्रेस पक्ष विचार करण्याच्या पलीकडे जाऊन जुना झाला आहे. त्यांचा विचारही जुना झाला आहे, त्यांचे कार्यही जुने झाले आहे. एवढा मोठा पक्ष, देशावर इतकी दशके राज्य करणारा पक्ष, काही वेळातच असा झाला. आम्हाला याचा आनंद नाही, यासाठी आमच्या संवेदना आहेत, असे मोदी म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT