Israel Vs Iran war | Narendra Modi Sarkarnama
देश

Israel Vs Iran war : आखातीच्या युद्धाग्नित एक कोटी भारतीय? पंतप्रधान मोदी 8 देशांशी थेट लाईनवर; नागरिकांच्या सुरक्षेला टॉप प्राधान्य!

US-Israel-Iran war : आखाती देशातील युद्धात एक कोटी भारतीय अडकल्याचं समोर येत असून, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ देशांशी संपर्क करत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे.

Pradeep Pendhare

Indians stranded in Gulf : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धात भारताची नेमकी भूमिका काय, हे परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदनानं जाहीर केलं. आखातीमधील युद्धाग्नित एक कोटींपेक्षा अधिक भारतीय अडकल्याचं समोर आलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धात असलेल्या 8 देशांच्या प्रमुखांची संपर्क करून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धावर भूमिका स्पष्ट केली. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या 48 तासांत, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवैत आणि कतार या आठ देशांच्या प्रमुखांची संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यांनी आठ देशांच्या प्रमुखांशी साधलेल्या संवादात, भारताने (India) सर्व बाजूंना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. या युद्धामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम होताना आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याकडे लक्ष वेधलं.

आखाती प्रदेशात जवळजवळ एक कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारताने ठामपणे विरोध करतो. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमुळे काही भारतीयांना आपले प्राण गमावले आहेत, तर काही बेपत्ता झाले आहेत. संघर्षामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दुतावासाकडून वारंवार सूचना जारी केल्या जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

आखातीमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूने आहोत, हे ठामपणे भारताने स्पष्ट केलं आहे. आखातीमधील युद्धात अनेकांचे जीवे गेले असून, भारत याबाबत शोक व्यक्त करतो. पण या संघर्षामुळे प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेत महत्त्वपूर्ण वाटा असलेला जवळचा शेजारी म्हणून, या घडामोडी मोठ्या चिंता निर्माण करतात, असा गंभीर मुद्दा उपस्थित करत, याबाबद देश गंभीर असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT