Narendra Modi Speech  Sarkarnama
देश

Narendra Modi Lok Sabha Speech : सव्वादोन तासांच्या भाषणात मोदींनी लोकसभेत प्रत्येकाचा हिशेब केला

Parliament No-Confidence Motion Debate : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला विरोधी बाकावरून वारंवार अडथळा आणला जात होता.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : केंद्रातील एनडीए सरकारविरुद्धच्या अविश्‍वास प्रस्तावावर कॉंग्रेसच्या राहुल गांधींपासून अधीर रंजन चौधरीपर्यंत अनेकजण केंद्र सरकारवर गेल्या दोन दिवसांत तुटून पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच त्यांचं लक्ष्य होते. या दोघांवरच सर्वांनी टीकेचे बाण सोडले. मात्र,आपल्या सव्वादोन तासाच्या प्रदीर्घ भाषणात मोदींनी प्रत्येकाचा हिशेब केला, तुटून पडणाऱ्या विरोधकांना ते पुरून उरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi) च्या भाषणाला विरोधी बाकावरून वारंवार अडथळा आणला जात होता.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करून ते बोलतच होते. तर, सत्ताधारी बाकावरून वारंवार मोदी,मोदी अशा घोषणांतून विरोधकांना उत्तर दिले जाते होते. त्यामुळे अध्यक्षांना दोन्ही बाजूंना इशारा द्यावा लागला.

शाह कालचे भाषण खूपच आक्रमक झाले. त्या तुलनेत मोदी संयमाने,पण ठाम बोलले.त्यांनी अडथळा आणणाऱ्या विरोधी खासदारांना शाह यांच्यासारखे दटावले नाही, तर त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. त्यांनी शाह यांच्या भाषणासारखी आपल्या खासदारांची साथ आपल्या भाषणात साथ घेतली.

गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांची जंत्री मांडली. तेथील जनता ''नो कॉन्फिडन्स कॉंग्रेस' असं म्हणत आहे, असा टोला त्यांनी लगावला. एकेका राज्याचे ते नाव घेत असताना सत्ताधारी बाकावरून कॉंग्रेस, नो कॉन्फिडन्स असा आवाज येत होता.

कॉंग्रेस व गांधी घराण्यालाच मोदींनी लक्ष्य केले. कॉंग्रेस(Congress) पक्षाने विचारच नाही,तर चिन्हही चोरले,त्यांनी दोनदा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला,त्यांच्या कपड्यांची चेष्टा केली,असे ते म्हणाले. कॉंग्रेस ही शर्म और लूट की दुकान, नफरत का बाजार असल्याचा घणाघात त्यांनी केला. ती भ्रष्टाचार,लांगूलचालन,घराणेशाही,देशातील अस्थिरता याची गॅरटी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

इंदिरा गांधींचे नाव घेऊन त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तर, राहुल(Rahul Gandhi) यांचे नाव न घेता त्यांची चेष्टा केली. पंडित नेहरूंचे नाव घेत त्यांच्यावरही त्यांनी टीका केली. एकूणच गांधी घराणे आणि कॉंग्रेस हाच त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू राहिला. त्यांनी ज्यांचं ज्यांचं वाईट चिंतलं,त्यांचंच चांगलं झालं असे सांगत त्यांनी त्यासाठी एलआयसी,ओझर,नाशिक येथील एचएएल आणि सरकारी बॅंकाची उदाहरणे दिली.

कॉंग्रेसच्या काळात गरीब आणखी गरीब झाला,तर आता आमच्या राजवटीत तो त्यातून बाहेर पडतो आहे, असे ते म्हणाले.शाह यांनी नाव न घेता राहूल गांधी यांना वारंवार लॉंच करूनही ते कसे फेल गेले हे सांगितले होते. ते मोदी आज पुन्हा बोलले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT