Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

Modi US visit : मोदींनी सगळ्या चर्चांमधली हवाच काढली; ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारण्यामागे मुनीर नव्हेत, सांगितलं वेगळंच कारण...

Narendra Modi Declines Donald Trump’s Invitation : पंतप्रधान मोदी शुक्रवारी (ता. 20) ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेमध्ये भाषण करताना त्यांनी ट्रम्प यांचे निमंत्रण आणि ते नाकारण्यामागचे कारण सांगितले.

Rajanand More

Spiritual Reason Behind Modi’s Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये असताना त्यांची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दुरध्वनीवरून संभाषण झाले होते. यावेळी ट्रम्प यांनी मोदींनी अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते. पण मोदींनी हे निमंत्रण नाकारले होते. त्याचदिवशी पाकिस्तानचे लष्कर प्रमुखही अमेरिकेत होते. त्यामुळे मोदींनी हे निमंत्रण नाकरल्याची चर्चा होती. पण आता यामागचे कारण मोदींनीच सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी (ता. 20) ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेमध्ये भाषण करताना त्यांनी ट्रम्प यांचे निमंत्रण आणि ते नाकारण्यामागचे कारण सांगितले. मोदी म्हणाले, मी दोन दिवसांपूर्वी कॅनडात जी ७ समिटसाठी गेलो होतो. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मला फोन आला होता.

तुम्ही कॅनडात आलाच आहात तर वॉशिंग्टनमध्ये येऊन जा. सोबत जेवण करू, चर्चा करू, असे ट्रम्प आपल्याला म्हणाल्याचे मोदींनी भाषणात सांगितले. पण मी अमेरिकेच्या राध्यक्षाध्यक्षांना सांगितले की, निमंत्रणासाठी धन्यवाद, पण मला तर महाप्रभुच्या भूमीवर (ओडिशा) जायचे आहे. त्यामुळे मी त्यांच्या निमंत्रणाला नम्रपणे नकार दिला. तुमचे प्रेम आणि महाप्रभूची भक्ती मला या भूमीकडे घेऊन आल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प आणि मोदींचे संभाषण होण्यापूर्वीच पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये मेजवाणीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यापार्श्वूमीवर ट्रम्प यांनी मोदींनाही निमंत्रित केल्याची चर्चा होती. पण मोदींनी निमंत्रण नाकारत ट्रम्प यांचा हेतू साध्य होऊ दिला नाही. हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे, अशा विविध चर्चा यावरून रंगल्या होत्या. पण आज मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ओडिशातील सभेमध्ये बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यनंतर देशात अनेक दशके लोकांनी काँग्रेसचे मॉडेल पाहिले. पण त्या मॉडेलमध्ये न सुशासन होते ना लोकांचे जगणे सोपे. विकासाच्या योजनांना लटकवणे, भटकवणे होत होते. भ्रष्टाचार ही काँग्रेसच्या विकास मॉडेलची ओळख होती. पण देश मागील काही वर्षांत व्यापक स्वरुपात भाजपचे मॉडेल पाहत आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT