Trump global politics : ट्रम्प यांच्या एका सहीनंतर पाकिस्तानला ‘जी हुजूर’ म्हणावंच लागेल; या ट्रॅपमधून आता सुटका नाही...

Donald Trump Meets Pakistan Army Chief Asim Munir : इराण आणि इस्त्राईलमध्ये सध्या युध्दाचा भडका उडाला आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहे. ट्रम्प यांनी इराणला कोणत्याही अटींशिवाय माघार घेण्याचा इशारा दिला होता.
Donald Trump in a strategic meeting with Pakistan Army Chief Asim Munir, reportedly to influence Pakistan’s stance on Iran.
Donald Trump in a strategic meeting with Pakistan Army Chief Asim Munir, reportedly to influence Pakistan’s stance on Iran. Sarkarnama
Published on
Updated on

US-Iran-Pakistan relations : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी खास मेजवानीचे आयोजन केले होते. व्हॉइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि मुनीर यांची ही भेट भारतासाठीही धक्कादायक ठरली. या भेटीआधी काही तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये दुरध्वनीवरून संभाषण झाले होते. पण केवळ भारतच नव्हे तर इराणचे टेन्शनही या भेटीने वाढले असून पाकची कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

इराण आणि इस्त्राईलमध्ये सध्या युध्दाचा भडका उडाला आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहे. ट्रम्प यांनी इराणला कोणत्याही अटींशिवाय माघार घेण्याचा इशारा दिला होता. पण इराणनेही अमेरिकेला ललकारले. त्यामुळे दुखावलेल्या ट्रम्प यांच्याकडून कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या अंतिम आदेशावर सही केली जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी हा आदेश जारी केल्यास इस्त्राईलची ताकद वाढणार आहे.

आता इथेच पाकिस्तानची खरी कसोटी लागणार आहे. युध्दामध्ये पाकिस्तान आपली मदत करेल, अशी आशा इराणला आहे. पण आता मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर तसे घडण्याची शक्यता धुसर आहे. याउलट ट्रम्प यांनी मुनीर यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करत पाकची चांगलीच कोंडी केली आहे. ट्रम्प म्हणतील तसे पाकला वागावे लागू शकते. इराण-इस्त्राईलच्या युध्दात ट्रम्प यांना हेच हवे आहे. अमेरिका इस्त्राईलसाठी युध्दात सहभागी झाल्यास थेट पाकिस्तानात जाऊन इराणला सहज लक्ष्य करणे शक्य होणार आहे.

Donald Trump in a strategic meeting with Pakistan Army Chief Asim Munir, reportedly to influence Pakistan’s stance on Iran.
Global viral trend : वर्ष 1941 मध्ये जे घडलं, तसंच 2025 मध्येही घडतंय! 'या' घटनांमुळे जगाला भरलीय धडकी...

पाकिस्तान आणि इराणची तब्बल 900 किलोमीटरची बॉर्डर आहे. त्यामुळे याभागातून इराणवर नियंत्रण ठेवणे किंवा थेट हल्ले करणे अमेरिकेला सोपे जाईल. अमेरिकेला पाकमधील एअर बस, हवाई हद्दीचा निर्धोकपणे वापर करता येऊ शकतो. अफगाणिस्तान विरोधातही पाकने अमेरिकेला मदत केली होती. त्याचप्रमाणे इराण-इस्त्राईल युध्दापासून पाकला दूर ठेवण्याचीही ट्रम्प यांची ही रणनीती असू शकते.

युध्दामध्ये इराणला कुणाकडूनही मदत मिळू नये, यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पाकिस्तान हे प्रमुख राष्ट्र आहे. अशावेळी भारताचा विरोध पत्करून ट्रम्प यांनी मुनीर यांना थेट व्हाईट हाऊसमध्ये बोलवत मोठा सन्मान देण्यामागे त्यांची भविष्यातील मोठी योजना असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी ते भारताची नाराजी पत्करण्यासही तयार आहेत. यामागे इराणवरील नियंत्रण हाच ट्रम्प यांना सर्वात मोठा फायदा दिसत असावा.

Donald Trump in a strategic meeting with Pakistan Army Chief Asim Munir, reportedly to influence Pakistan’s stance on Iran.
Modi Vs Trump : ट्रम्प यांच्याकडून पाक लष्कर प्रमुखांसाठी बिर्याणीचा बेत; मोदी अडकले नाहीत ट्रॅपमध्ये...

पाकिस्तानसमोर आव्हान

ट्रम्प यांच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानसमोर मोठा आव्हान असणार आहे. मुस्लिम देशांमध्ये आपली प्रतिमा उंचावण्यासाठी इराणच्या मदतीला धावून जाणे, पाकिस्तानसाठी महत्वाचे आहे. पण दुसरीकडे अमेरिकेची नाराजीही परवडणारी नाही. अमेरिकेकडून पाकिस्ताना अत्याधुनिक सैनिकी मदतीशिवाय मोठी आर्थिक मदतही मिळू शकते. ते नाकारणेही पाकसाठी नाकर्तेपणाचे ठरणार आहे. ट्रम्प यांची नाराजी ओढवून घेतल्यास आर्थिकदृष्ट्या दुबळ्या पाकला मदतीवर पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे मुनीर यांच्यासह सरकारवरही मोठा दबाव असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com