PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi On GST Reform : पंतप्रधान मोदी 19 मिनिटांत काय-काय म्हणाले? तोंड गोड होणार, पण तुमच्यावर मोठी जबाबदारीही टाकली...

Impact of GST Reform on Common Citizens : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. देशात जीएसटी बचत उत्सवाला सुरूवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Rajanand More

PM Narendra Modi’s 19-Minute GST Address: Key Highlights : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. देशवासियांसाठी ते कोणती मोठी घोषणा करणार, याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. अखेर त्यांनी अपेक्षेप्रमाणे उद्यापासून लागू होत असलेल्या नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांबाबत भाष्य केले. केवळ 19 मिनिटांच्या या संवादामध्ये त्यांनी अनेक महत्वाची विधाने करत देशवासियांना खूशखबर तर दिलीच पण स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहनही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना अनेक महत्वपूर्ण विधाने केली आहेत. त्यामध्ये सुरूवातीलाच त्यांनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत गोड बातमी दिली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. एकप्रकारे उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींची महत्वपूर्ण विधाने –

-    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू होणार आहे. देशात जीएसटी बचत उत्सवाला सुरूवात.

-    या उत्सवात तुमची बचत वाढून तुम्ही तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक खरेदी करू शकता.

-    आपल्या देशातील गरीब, मध्यवर्गीय लोक, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या उत्सवाचा खूप फायदा होईल.

-    उत्सवांमध्ये प्रत्येकाचे तोंड गोड होणार आहे. कुटुंबामधील आनंद वाढणार आहे. ही बचत देशाच्या विकासाचा वेग वाढवेल.

-    देशातील लोक आधी करांच्या जंजाळात फसले होते. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी 2017 मध्ये जीएसटी आणण्यात आला.

-    सर्व राज्ये, घटकांशी चर्चा केली. सर्वांचे शंकानिरसन केले. सर्वांना सोबत घेऊन जीएसटी सुधारणा करू शकलो. हा केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम आहे.

-    जीएसटी सुधारणांमुळे रोजच्या जगण्यातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. बहुतेक वस्तू टॅक्स फ्री होतील. जवळपास 99 टक्के वस्तूंवर पाच टक्के किंवा टॅक्स फ्री असतील.

-    प्राप्तिकरातील सूट आणि जीएसटी सुधारणा हे एकत्रित केले तर मागील एक वर्षांत घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील जनतेची अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होईल. त्यामुळे हा बचत उत्सव असल्याचे मी म्हणत आहे.

-    आत्मनिर्भर भारतासाठी हे एक मोठे पाऊल आहे. देशातील सर्व घटकांना याचा फायदा होणार आहे.

-    MSME शी संबंधित उद्योगांकडून मला खूप अपेक्षा आहेत. आपल्याकडी लघु उद्योजक ज्या वस्तू बनवतील, त्या सर्वात दर्जेदार असायला हव्यात.

-    देशाच्या गरजेनुसार आम्ही सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा विकसित भारताला गती देतील, व्यापार सोपे करतील, गुंतवणूकदारांना आकर्षित करतील, राज्यांना विकासाच्या वाटचालीत भागीदार बनवतील.

-    आपण नागरीक देवो भव: या मंत्रानुसार पुढे जात आहोत. त्याचीच झलक जीएसटी सुधारणांमध्ये दिसत आहे.

-    विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या दिशेनेही पुढे जावे लागेल.

-    प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतिक बनायला हवे. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजायला हवे. मी स्वदेशी खरेदी करतो, असे तुम्ही गर्वाने म्हणा.

-     आपल्याला परदेशी वस्तूंपासून मुक्त व्हायला हवे. मेड इन इंडिया वस्तूच आपण खरेदी करायला हव्यात. स्वदेशीचा मंत्र घेऊन पुढे जायला हवे. तेव्हाच देश वेगाने पुढे जाईल आणि आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT