OBC Reservation : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार; आक्रमक लक्ष्मण हाकेंना वगळलं, नेमकं काय घडतंय?

Chhagan Bhujbal Leads OBC Rally in Beed : बॅनरवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त श्रीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत.
Chhagan Bhujbal, Laxman Hake
Chhagan Bhujbal, Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी मेळावा आयोजित केला आहे, ज्याचे नेतृत्व छगन भुजबळ करणार असून याला “महाएल्गार सभा” असे नाव देण्यात आले आहे.

  2. या मेळाव्याच्या बॅनरवर ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत, मात्र सातत्याने ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांचा फोटो जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसते.

  3. हाके यांना का डावलले, हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आणि फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

OBC Movements in Maharashtra : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासन निर्णय प्रसिध्द केल्यानंतर ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांसह लक्ष्मण हाके हेही त्यामध्ये आघाडीवर आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व ओबीसी नेते सुरात सूर मिसळत असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे.

बीडमध्ये येत्या रविवारी (ता. 28 सप्टेंबर) ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा असे बॅनरवर म्हटले आहे. 

बॅनरवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त श्रीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Chhagan Bhujbal, Laxman Hake
Congress defeat news : राहुल गांधींना तरूणाईकडून तीन दिवसांत दुसरा धक्का; बहुमत असलेल्या राज्यातच पराभव

हाके यांना या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले नाही का, हाकेंना या मेळाव्यातून जाणीवपूर्वक डावलण्यात आले का, समती परिषदेकडून हाके यांच्याबाबत ही भूमिका का घेण्यात आली, ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अद्याप आयोजकांकडून या बॅनरबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे समता परिषदेची हाकेंबाबत नेमकी भूमिका काय, हे समोर येऊ शकलेले नाही. 

ओबीसी आरक्षणासाठी हाके यांच्याकडून सातत्याने आक्रमकपणे भूमिका मांडली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरही ते सातत्याने टीका करत असतात. फडणवीस सरकारवरही ते आसूड ओढतात. पण छगन भुजबळ यांच्या मेळाव्यातून त्यांना वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

Chhagan Bhujbal, Laxman Hake
Gunratan Sadavarte Video : मराठा बांधवांचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसही रोखू शकले नाहीत...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: बीडमध्ये ओबीसींचा मेळावा कधी होणार आहे?
A: 28 सप्टेंबर रोजी.

Q2: या मेळाव्याचे नेतृत्व कोण करणार आहे?
A: छगन भुजबळ.

Q3: बॅनरवरून कोणत्या नेत्याला वगळण्यात आले आहे?
A: लक्ष्मण हाके.

Q4: हाके यांच्या वगळण्यामुळे कोणता प्रश्न निर्माण झाला आहे?
A: ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली का, हा प्रश्न.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com