PM modi
PM modi Sarkarnama
देश

PM modi : जगातील सर्वात लोकप्रिय नेते मोदीच ! ; बायडन यांनाही टाकलं मागे, ऋषि सुनक पहिल्या दहामध्येही..

सरकारनामा ब्यूरो

Most Popular Leader Narendra Modi : : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानची राजधानी टोकियोमध्ये होत असलेल्या शिखर परिषदेला ते उपस्थित आहेत. मोदींची लोकप्रियता वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ( Narendra Modi Most Popular Leader Approval Rating tops the list)

'मॉर्निंग कन्सल्ट'ने केलेल्या पाहणीत मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकत या यादीत मोदी अव्वल स्थानी पोहोचले आहेत. दहा मे ते सोळा मे या दरम्यान 'मॉर्निंग कन्सल्ट'ने ही पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पीएम मोदींना 78 टक्के ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेट आहेत. त्यांना ६२ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहेत. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ६२ टक्के अप्रूव्हल रेटिंग गुण मिळाले आहेत. मात्र, त्यांना नाकारणाऱ्यांची संख्या जास्त राहिली.

या लोकप्रिय नेत्यांच्या सूचीमध्ये पंतप्रधान मोदींसह स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इंग्लडचे पंतप्रधान ऋषि सुनक , फ्रान्सचे अध्यक्ष इमैनुएल मैक्रो यांची रेटिंग असाधानकारक आहेत. बायडेन यांना ४२ टक्के (सातव्या क्रमांकावर) आहेत. तर ऋषि सुनक हे पहिल्या दहामध्येही नाही. त्यांना ३३ टक्के मिळाले असून ते तेराव्या स्थानावर आहेत.

मॉर्निंग कंसल्ट असा करतात अहवाल..

'मॉर्निंग कंसल्ट' हे दररोज वीस हजार नागरिकांचे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते अहवाल तयार करीत असतात.

या पाहणीत अमेरिकेतील ४५ हजार अमेरिकन नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहेत. अन्य देशामध्ये ५०० ते ५०००० जणांची त्यांनी संवाद साधला आहे. त्या,त्या देशाची लोकसंख्या, जनजीवन यांच्या आधारावर ही पाहणी करण्यात आली आहे. 'मॉर्निंग कंसल्ट'ने शिक्षित नागरिकांच्या संवाद साधला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT