RBI withdraw Rs 2,000 : नोटबंदीनंतर सापडलं मोठं घबाड ; सचिवालयाजवळ दोन हजाराच्या नोटा, सोन्याचं बिस्किट..

RBI withdraw Rs 2,000 : सापडलेलं सोनं आणि रोकड कुणाची आहे, ते अद्याप समजू शकलेलं नाही.
RBI on 2000 Note:
RBI on 2000 Note:Sarkarnama

RBI withdraw Rs 2,000 : "चलनातील दोन हजार रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) घेतला आहे. आता नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (two crore cash found in rajasthan after note ban decision)

दोन हजाराच्या नोटा २३ मे पासून बदलून मिळणार आहेत, या पार्श्वभूमीवर काही जणांनी लपून ठेवलेल्या नोटा बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दोन कोटींहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. तर एक किलो सोन्याचं घबाड देखील सापडलं आहे.

राजस्थान सरकारच्या सचिवालयाजवळ असलेल्या योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये २ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आणि एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडल्याने खळबळ उडाली आहे. सापडलेलं सोनं आणि रोकड कुणाची आहे, ते अद्याप समजू शकलेलं नाही.

RBI on 2000 Note:
RBI withdraw Rs 2,000 Note : हा नोटबंदीचा प्रकार नाही ; 'नॅफकब'चे अनास्कर म्हणाले, 'कायदेशीरता अबाधित..'

योजना भवनात सध्या संगणकीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे बेसमेंटमधील कपाटांमध्ये पडून असलेल्या फाईली बाहेर काढल्या जात आहेत. यावेळी येथील दोन कपाटांच्या चाव्या मिळाल्या नाहीत.

या कपाटांच्या किल्ल्या शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही कपाटांची कुलूपं तोडण्यात आली. यातील एका कपाटात फाईल्स होत्या, अशी माहिती पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिली.

RBI on 2000 Note:
Jagdish Tytler : शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधात CBIचे आरोपपत्र ; नवा पुरावा दाखल

एका कपाटात फाईल्ससोबत एक बॅग दिसली. या बॅगेबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी पोलिसांना कळविण्यात आले. कोट्यवधींच्या नोटा सापडल्याची माहिती समोर येताच मुख्य सचिव उषा शर्मा, पोलिस महासंचालक उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली.

कपाटात काय सापडले ..

  • २००० रुपयांच्या ७,२९८ नोटा आहेत. त्याचं मूल्य १ कोटी ४५ लाख ९६ हजार रुपये इतकं आहे.

  • ५०० रुपयांच्या १७ हजार १०७ नोटा आढळल्या आहेत. त्यांचं मूल्य ८५ लाख ५३ हजार ५०० रुपये आहे.

  • एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे. त्यावर 'मेड इन स्वित्झर्लंड' असा उल्लेख आहे.

  • या सोन्याची बाजारातील किंमत ६२ लाख रुपयांच्या घरात आहे.

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com