PM Modi latest news : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस नेदरलँडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी देशातील जगप्रसिध्द अफ्सलाउटडाइक धरणाची पाहणी केली. जल व्यवस्थापन, पूर नियंत्रण, हवामान बदल आदी बाबतीत नेदरलँडने जगासमोर जल व्यवस्थापनात एक आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी धरणाची पाहणी केल्यानंतर नेदरलँडच्या जल व्यवस्थापनातून खूप काही शिकण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँड दौऱ्यात दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. राजकीय संवाद, आर्थिक सहकार्य आणि गुंतवणूक, जल-कृषी आणि आरोग्य, नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान, नवोन्मेष, विज्ञान आणि शिक्षण, ऊर्जा संक्रमण, शाश्वत विकास आणि सागरी विकास, संरक्षण सहकार्य, सुरक्षा सहकार्य, स्थलांतर, गतिशीलता आणि वाणिज्यदूतविषयक बाबी, संस्कृती आणि लोकसंपर्क देवाणघेवाण आदींमध्ये परस्पर सहकार्य करण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.
पंतप्रधान मोदी यांनी प्रसिध्द अफ्सलाउटडाइक धरणाला भेट दिल्याची माहिती सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नेदरलँडने जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण जगाने नेदरलँडचा अनुभव आणि तंत्रातून शिकण्याची गरज आहे. जल व्यवस्थापनाच्या या आधुनिक तंत्राला स्वीकारण्यासाठी भारत कटिबध्द आहे.
जलसिंचन व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, पुरापासून सुरक्षा निश्चित करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ते आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी या दौऱ्याचे फोटोही सोशल मीडियात शेअर केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या धरणाची माहिती दिली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, हे धरण केवळ अभियांत्रिकी प्रकल्प नाही तर नाविन्यता आणि व्हिजनचे प्रतिक आहे. समुद्रातील पाण्याला नियंत्रित करण्याबरोबर पुरापासून वाचण्यासाठी आणि गोडे पाणी साठविण्यातही धरणाची महत्वाची भूमिका आहे. या दौऱ्यात गुजरातमधील कल्पसर प्रकल्पाचीही चर्चा झाली. खंबातच्या खाडीत बांध बांधून गोड्या पाण्याचे जलाशय निर्माण करण्यासंबंधातील हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उपयोग जलसिंचन, पिण्याचे पाणी आणि ऊर्जा क्षेत्राची गरज भागविण्यासाटी होणार आहे.
दरम्यान, भारत आणि नेदरलँडमध्ये मार्च 2022 मध्ये जल क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीझाली होती. ही भागीदारी मार्च 2027 पर्यंत अंमलात असणार आहे. त्याच्या नुतणीकरणाची इच्छा दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन, सागरी किनारपट्टीचे एकात्मिक व्यवस्थापन, शहरी जल व्यवस्थापन, पूर स्थितीतील लवचिकता, नदी खोरे व्यवस्थापन आणि गंगा खोऱ्यातील पाण्याची शाश्वत गुणवत्ता आणि उपलब्धता या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावरही चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.