New Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येणार, एनडीए की इंडिया आघाडी? पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) की राहुल गांधी?... या प्रश्नांची उत्तरे चार जूननंतर मिळतील. पण मागील दहा वर्षे पंतप्रधान असलेल्या मोदींच्या कामगिरीबाबत मतदारांनाही उत्सुकता आहे. मोदींनीही आपण रोज 18 तास काम करत असल्याचे अनेकदा सांगितले आहे. आता माहिती अधिकारातूनच त्यांनी किती काम केले, किती सुट्ट्या घेतल्या याची माहिती समोर आली आहे.
वाराणसीतील दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरमधील प्रा. शेखर खन्ना यांनी पंतप्रधान (Prime Minister) कार्यालयाकडून मोदींनी मागील दहा वर्षांच्या काळात किती सुट्ट्या घेतल्या याची माहिती मागवली होती. ही माहिती त्यांना 15 एप्रिलला प्राप्त झाली. त्यानुसार मागील दहा वर्षांत मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी अभिनेता अक्षय कुमार यांना काही वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी आपण दररोज 18 तास काम करत असल्याचे सांगितले होते. केवळ साडेतीन ते चार तास झोप घेत असल्याचेही ते म्हणाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान कार्यालयातील अपर सचिव प्रवेश कुमार यांनी माहिती अधिकारात पंतप्रधानांनी एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याची माहिती दिली आहे. एकही दिवस सुट्टी न घेता पंतप्रधान मागील दहा वर्षे काम करत असल्याचे या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीतही भाजपची (BJP) सत्ता पुन्हा येईल आणि पंतप्रधान मोदीच होतील, असा विश्वास नेत्यांना आहे. सत्तेत आल्यानंतर पुढील शंभर दिवसांचा प्लॅनही तयार करण्यात आला आहे. मागील दहा वर्षे केवळ ट्रेलर असल्याचे मोदींकडून सध्या भाषणांमध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर मोदींचा नेमका प्लॅन काय असेल, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.