Lok Sabha Election 2024, 28 May : देशात लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडेल. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी विविध तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ( west bengal ) भाजपला ( bjp ) सर्वोत्तम यश मिळणार, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधत होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्तम ठरणार आहे. बंगालच्या निवडणुका एकतर्फी आहेत. निवडणुकीचे नेतृत्व जनता जनार्दन करत आहे. त्यामुळे सरकारमधील 'टीएमसी'चे लोक गडबडले आहेत, असं पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi ) म्हटलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"पश्चिम बंगालमध्ये सतत हत्या होत आहेत. हल्ले करण्यात येत आहेत. मतदानाआधी भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. तृणमूल काँग्रेस बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक निवडून आले होते. बंगालच्या जनतेनं आम्हाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला 80 जागा निवडून दिल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. यंदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत भाष्य केलं आहे. "भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही लोकशाहीत वैर ठेवत नाही. आता प्रश्न आहे की, मी माझ्या संबंधांची काळजी करावी की ओडिशाच्या कल्याणाची? मी ओडिशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वत:ला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी माझ्या नात्यांचा त्याग करावा लागला तरी मी करेन. निवडणुकीनंतर मी सर्वांना समजावून सांगेन की माझे कुणाशीही वैर नाही," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.