Narendra Modi Marathwada Sabha News : मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा 'डेंजर झोन'मध्ये ?

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील ज्या पाच मतदारसंघात सभा घेतलल्या त्यापैकी बीड वगळता चारही मतदारसंघातील उमेदवार डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते.
Narendra Modi Marathwada Sabha News
Narendra Modi Marathwada Sabha NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मोदींची सभा म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी, असे समीकरण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून बनले होते. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची नैय्या पार झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतही मोठ्या तीन राज्यात लोकांनी 'मोदी गॅरंटी'वर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांना मोदी गॅंरटीचा आधार मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आठही लोकसभेच्या मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आठपैकी पाच मतदारसंघात यावेळी सभा घेतल्या.

म्हणजे जवळपास सगळ्या मराठवाड्यात मोदींनी प्रचार केला. नांदेड, बीड, लातूर या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर धाराशिव, परभणी या दोन जागा महायुतीतील घटक पक्षाला सोडण्यात आल्या होत्या.

Narendra Modi Marathwada Sabha News
Maharashtra CM : 'ग्रामपंचायतही न लढलेले उद्धव ठाकरे पवारांना मुख्यमंंत्रिपदासाठी सक्षम कसे वाटले?'

मराठवाड्यात 26 एप्रिल, 7 आणि 13 मे अशा तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये बऱ्यापैकी उत्साह होता हे ही मतदानाच्या टक्केवारीत स्पष्ट झाले. परंतु मतदानानंतर जी आकडेमोड केली जाते, स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सर्व्हेचा हवाला बघितला तर वेगळेच चित्र समोर येताना दिसते आहे. अर्थात हा अंदाज असला तरी तो सत्ताधारी महायुतीसाठी धक्का देणारा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील ज्या पाच मतदारसंघात सभा घेतलल्या त्यापैकी बीड वगळता चारही मतदारसंघातील उमेदवार डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते. लातूरचे सुधाकर श्रृंगारे, धाराशिवच्या अर्चना पाटील, परभणीचे महादेव जानकर(Mahadev Jankar) यांच्या उल्लेख मोदींनी मेरे छोटे भाई असा केला होता ते आणि नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचा सूर सगळ्या बाजूंनी उमटताना दिसतोय. आता हा अंदाज खरा ठरतो? की मोदींची गॅरंटी चालते हे चार जून रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi Marathwada Sabha News
Sharad Pawar Vs Ajit Pawar : जे सोडून गेले त्यांच्याबाबत आमचं ठरलंय...; अनिल देशमुखांनी एकदम स्पष्टच केलंय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com