PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : भाजपच्या खासदारांना व्हीप ; '13 फेब्रुवारीपर्यंत.."

Budget Session 2023 : आज मोदी राज्यसभेत झालेल्या चर्चेत भाग घेणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Budget Session 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

अदानी समुहावरुन तीन दिवसापासून संसदेच्या अधिवेशनात गदारोळ सुरु आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.

राजधानी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) लोकसभेत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत त्यांनी कॉंग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. आज मोदी राज्यसभेत झालेल्या चर्चेत भाग घेणार आहेत.

आपल्या सर्व लोकसभा भाजपने खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. यामध्ये 13 फेब्रुवारीपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

काल (बुधवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काही टीका करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका मोठ्या नेत्याने त्यांचा अपमान केला, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. अशा लोकांना म्हटलं जातं की ‘यह कह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है,’ असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला.

आपल्या 85 मिनिटांच्या भाषणात त्यांनी राहुल गांधींनी अदानींवर विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. मोदींच्या संपूर्ण भाषणात अदानींचा उल्लेखही नव्हता. मात्र, विरोधकांच्या एकजुटीपासून ते राहुल यांच्या भारत जोडो यात्रेपर्यंत पंतप्रधानांनी टीका केली.काल राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा पूर्ण झाली. विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जून खर्गे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावर आज मोदी काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT