PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : ‘मी याचे मूर्तिमंत उदाहरण’; मुख्यमंत्रिपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर मोदी पहिल्यांदाच बोलले

Rajanand More

BJP News : मागील काही वर्षांत सत्ता मिळालेल्या राज्यांमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वांनाच धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या या रणनीतीमुळे पक्षातील नेतेही चकीत होतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये त्याचे ताजे उदाहण आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) मोहन यादव, राजस्थान (Rajasthan) भजनलाल शर्मा आणि छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. निवडणुकीनंतर या तिघांची नावे चर्चेत नव्हती. पण भाजपने (BJP) धक्के देण्याचा ट्रेंड कायम ठेवत या तिघांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान मोदी (PMNarendra Modi) यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुखाखतीत या ट्रेंडवर भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, हा नवीन ट्रेंड नाही. वास्तविक, भाजपमध्ये या प्रक्रियेतील सर्वात मोठे मूर्तिमंत उदाहरण आहे. मला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवडण्यात आल्यानंतर कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता. विधानसभेवर निवडूनही गेलो नव्हतो. हा नवीन ट्रेंड होता. कारण आज इतर सर्व पक्षांमध्ये घराणेशाही आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घराणेशाहीवर टीका करताना पंतप्रधान यांनी अशा पक्षांना लोकशाहीमधील हे मंथन कठीण वाटत असल्याचे सांगितले. एकाचवेळी नेतृत्वाच्या अनेक पिढ्या तयार करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. भाजपच्या अध्यक्षांकडे पाहिले तरी प्रत्येकवेळी नवीन चेहरे दिसतील. आमचा केडरआधारित पक्ष आहे. आम्ही सर्वांनी कार्यकर्ता म्हणून सुरूवात केली आणि कठोर मेहनतीने पुढे आलो आहे.

लोकशाहीमध्ये नवीन पिढी आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देणे आवश्यक आहे. लोकशाहीतील हे मंथन लोकशाही जिवंत ठेवते. हेच मंथन आमचे कार्यकर्त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षा जिवंत ठेवतात. मेहनत करून तेही पक्षात पुढे येऊ शकतात, असे त्यांना वाटते. आमचा पक्ष वेगवेगळे प्रयोग करतो. गुजरात मंत्रिमंडळात सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. दिल्लीच्या स्थानिक निवडणुकांमध्येही असाच पर्याय अवलंबला होता, असेही मोदींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT