Smriti Irani : सगळी कागदपत्र जमा करू का..! स्मृती इराणींनी अधिकाऱ्याला भरला दम

Amethi Constituency : अमेठीत इराणींनी अधिकाऱ्याला घेतले फैलावर...
Union Minister Smriti Irani
Union Minister Smriti IraniSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या (Amethi) खासदार स्मृती इराणी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. निवृत्त शिक्षकांची थकित रक्कम मिळत नसल्याने इराणी यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला. पण समोरून अधिकाऱ्यांकडून त्रुटी सांगण्यास सुरूवात केल्याने इराणींनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आजच्या आज सगळी प्रलंबित काम पूर्ण करा, असा दमच त्यांनी भरला.

स्मृती इराणी (Smriti Irani) तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी निवृत्त शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी त्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर इराणी यांनी थेट संबंधित शिक्षण निरीक्षकांना फोन केला. त्यावर निरीक्षकांनी निवृत्त शिक्षकांच्या कागदपत्रांतील त्रुटी नियम सांगण्यास सुरूवात केली. हे पाहून इराणी यांनी सुरूवातीला सौम्य शब्दांत त्यांना आजच्या आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले. (Latest Marathi News)

Union Minister Smriti Irani
Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

शिक्षण निरीक्षक ऐकत नसल्याचे पाहून इराणी यांनी, मी जर सर्व कागदपत्रे जमा करणे, नियम दाखवणे सुरू करू का. तुम्ही जर जाणीवपूर्वक वेतन देत नसाल, हे स्पष्ट झाले तर? असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला. तुम्ही मला दहा मिनिटे सुनावत असाल तर शिक्षकांचे किती हाल करत असाल, असा उलट प्रश्न इराणींनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदारांकडून फोन आल्यानंतर तुम्ही शिक्षक किती खराब आहेत हे सांगत आहात. त्यांचे किती हाल करत असाल. 72 वर्षाचे निवृत्त शिक्षक माझ्यासोबत आहेत. माझी विनंती आहे, त्यांना त्यांचे अधिकार द्यावेत.

योगी सरकारही शिक्षकांना अधिकार देत आहे. तुम्ही अडथळा बनू नका. ही अमेठी आहे, इथे प्रत्येक नागरिक कागदपत्रांसह खासदारापर्यंत पोहचू शकतात, अशा कडक शब्दांत इराणी यांनी निरीक्षकाला सुनावले. तसेच आजच्या आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यासही त्यांना सांगितले.

Union Minister Smriti Irani
Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com