Lakhbir Singh Landa : गँगस्टरच्या यादीत आणखी एक नाव

Home Ministry : केंद्रीय गृह मंत्रालयाने काढली अधिसूचना...
Lakhbir Singh Landa
Lakhbir Singh LandaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भारताने कॅनेडियन गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी विरोधी कायद्यांतर्गत (UAPA) ही कारवाई केली आहे. मोहालीत 2021 मध्ये पंजाब (Punjab) पोलिस मुख्यालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये 33 वर्षीय गँगस्टर लांडा याचा समावेश होता.

लांडा (Lakhbir Singh Landa) हा कुख्यात खलिस्तानी समूह बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सक्रिय सदस्य असल्याचे गृह मंत्रालयाने (Home Ministry) म्हटले आहे. त्याचा जन्म पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात 1989 मध्ये झाला आहे. 2017 मध्ये तो कॅनडाला (Canada) पळून गेला. हरविंदर सिंग ऊर्फ रिंदा लांडा याचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. रिंदा हा पाकिस्तानातील (Pakistan) गँगस्टर आहे.

Lakhbir Singh Landa
Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

भारतातील अनेक दहशवादी हल्ले व इतर मोठ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये लांडा याचा मुख्य सहभाग असायचा. गृह मंत्रालयानुसार, लांडा केवळ मोहाली रॉकेट हल्ल्यातील आरोपी नसून त्याने सीमेवरील दहशतवादी कारवायासांठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, अत्याधुनिक उपकरणे, स्फोटके पुरवली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, हत्या, ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी, दहशतवादी हल्ल्यांसाठी पैशांची उपलब्ध करून देणे, अशा अनेक गुन्ह्यांमध्ये लांडाचा सहभाग आहे. कॅनडातील अनेक खलिस्तानी संघटनांशी त्याचे संबंध आहेत. त्यात शीख फॉर जस्टीसचा गुरपतवंत सिंग पन्नू आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा दिवंगत हरदीप सिंग निज्जर आदींचा समावेश आहे.

Lakhbir Singh Landa
Jitendra Awhad News : '...म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन करा’, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com