Narendra Modi NCC  ANI
देश

"मी देखील कधीकाळी 'NCC' कॅडेट होतो" : PM नरेंद्र मोदी

Narendra Modi | NCC : NCC अर्थात नॅशनल कॅडेट्स कॉर्प्सच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दिल्लीतील करिअप्पा मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून ओळखल्या जाणारऱ्या NCC अर्थात नॅशनल कॅडेट्स कॉर्प्सच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यात त्यांनी कॅडेट्सना संबोधितही केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील त्यांनी कॉर्प्सच्या काही तुकड्यांची पाहणी केली. या दरम्यान एनसीसी कॅडेट्सनी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला. गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी एनसीसीच्या तुकडीच्या मार्चपास्टचाही आढावा घेतला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मी देखील कधी काळी तुमच्या सारखाच एनसीसीसचा सक्रिय कॅडेट असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, मला एनसीसीच्या दिवसांमध्ये जी काही ट्रेनिंग मिळाली, जे काही शिकायला मिळाले, त्यातून आज देशाप्रती असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला ताकद मिळते. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि एक तरुण या प्रकारच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनतात तेव्हा या महोत्सवात एक वेगळाच उत्साह दिसतो असे म्हणत यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या उपस्थित कॅडेट्सच्या उत्साहाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, आज यावेळी जितके तरुण-तरुणी एनसीसी-एनएसएसमध्ये आहेत, त्यालील बऱ्यापैकी सर्वजण याच दशकात जन्माला आले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते २०४७ मध्ये भारताला शंभर वर्षेपूर्तीच्या क्षणापर्यंत तुम्हालाच सर्वांनाच घेवून जायचं आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न, तुमचे संकल्प आणि त्या प्रयत्नांची पूर्ताता हे सर्व यश तुमच्यासोबत भारताचे देखील असणार आहे. त्यातून भारतातच विकास आणि प्रगती होणार आहे.

आज जेव्हा देश नवनवीन संकल्पनांना घेऊन पुढे जात आहे, तेव्हा देशातील एनसीसीला मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशात उच्चस्तरीय आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. मागील २ वर्षांत आम्ही देशाच्या सीमावर्ती भागात १ लाख नवीन कॅडेट तयार केले. आता देशातील मुली सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. लष्करात महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. हवाई दलात देशाच्या कन्या लढाऊ विमाने उडवत आहेत. अशा परिस्थितीत आता जास्तीत जास्त मुलींचा एनसीसीमध्ये समावेश व्हावा, हा आमचा प्रयत्न असायला हवा, असाही आशावाद पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT