पृथ्वीराज चव्हाणांकडे तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan उत्तरप्रदेश Uttar Pradesh, उत्तराखंड Uttarakhand व गोवा Goa या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी ते नुकतेच लखनऊला Lucknow रवाना झाले आहेत.
Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan Newssarkarnama

कऱ्हाड : पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने निवडणुकीत उतरला आहे. काँग्रेस पक्षाने जेष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार श्री. चव्हाण हे लखनऊला रवाना झाले आहेत. (Prithviraj Chavan News)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पध्दतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अशा काही तंत्रानुसार प्रचार सुरू आहे.

Prithviraj Chavan News
मुंबई महापालिकेतील स्वबळासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा कानमंत्र!

यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवले आहे. पृथ्वीराज चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी ते नुकतेच लखनऊला रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com