PM Narendra Modi delivering his 79th Independence Day speech from the Red Fort, issuing a stern warning to Pakistan. sarkarnama
देश

PM Modi Warning to Pakistan : लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा, 'अणुबाॅम्बच्या धमकी...'

PM Narendra Modi 79th Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला इशारा दिला.

Roshan More

Narendra Modi News : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लालकिल्ल्यावरून भाषण केले. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी सलग बाराव्यांदा ध्वजारोहण केले आहे. ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेकडून लादलेले टॅरिफ याच्याबाबात पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता होती. त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूरच्या उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

पाकिस्तानला इशारा देत पंतप्रधान म्हणाले, अणूबाॅम्बच्या ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही. लष्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. पाणी आणि रक्त वाहू देणार नाही.

पहलगाम येथील त्या नरसंहारामुळे संपूर्ण भारत हादरला. धर्म विचारून आंतकवाद्यांनी मारले. त्याच संतापची अभिव्यक्ती 'ऑपरेशन सिंदूर' आहे. पाकिस्तानमध्ये इतका मोठा विध्वंस झाला आहे की दररोज नवी नवी उघड होत आहेत आणि नवी माहिती समोर येत आहे.आपल्या वीर सैनिकांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा दिली, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले.

पहलगामच्या घटनेनंतर, 22 तारखेनंतर आम्ही आपल्या लष्कराला मुक्त हात दिला. रणनीती, लक्ष्य आणि वेळ याचा निर्णय त्यांनी घेतला. जे अनेक दशकांत झाले नव्हते ते लष्कराने केले. शेकडो किलोमीटर आत शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी मुख्यालय नष्ट केले, असे देखील ते म्हणाले.

सिंधूच्या पाण्यावर भारताच्या शेतकऱ्यांचा अधिकार

सिंधू जल वाटप हा अन्यायकारक आणि एकतर्फी असल्याचे देशातील नागरिकांना कळले आहे. भारतातून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी आपल्या शत्रूंची शेती सिंचन करत आले. मात्र, माझ्याच देशातील शेतकरी मात्र तहानलेले राहिले,शेती पाण्याविना राहिली. या करारामुळे अनेक दशकांपासून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. आता या पाण्यावरचा हक्क फक्त भारताच्या शेतकऱ्यांचा आहे, असे देखील पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT