Pakistan occupied Kashmir protest : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतासमोर गुडघे टेकलेल्या पाकिस्तानसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरत असून त्यांना आवर घालणे, सुरक्षा यंत्रणांना शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे लाठीमार, गोळीबार करून नागरिकांव अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. नागरिकही पाक सुरक्षा यंत्रणांविरोधात आक्रमक झाले आहेत.
पीओकेमध्ये विविध पायाभूत सुविधा मिळााव्यात, यांसह विविध मागण्यांसाठीचे आंदोलन पेटले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता हे आंदोलन हाती घेतले आहे. शुक्रवारचा या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या पोलीस, लष्करालाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. पोलिसांकडून नागरिक वर्दी, हेल्मेट तसेच इतर साहित्य हिसकावून घेत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावरच केवळ १०-१० रुपयांत त्याची विक्रीही केली जात आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानी सुरक्षा दलांची एकप्रकारे खिल्ली उडवली जात आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. स्थानिक लोकांकडून त्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियात टाकले जात आहेत. दरम्यान, या आंदोलनाची धग आता इस्लामाबादपर्यंत पोहचली आहे. पंतप्रधान शहबाज यांच्या सरकारचे टेन्शन वाढले आहे. आंदोलकांच्या प्रमुख ३८ मागण्या असून त्यावर ते अडून बसले आहेत.
आंदोलनादरम्यान आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. पीओकेमधील अनेक भागातील दुकाने, व्यापार बंद आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मागण्यांबाबत पाकिस्तान सरकार आणि जम्मू-काश्मीर अवामी अक्शन कमेटीमध्ये चर्चेला सुरूवात झाली असली तरी नागरिकांचा रोष कमी झालेला नाही.
नागरिकांवर पोलीस, सैन्याकडून कथितपणे अत्याचार केले जात असल्याचा, त्यांचा हत्या होत असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे नागरिक सैन्याला टार्गेट करताना दिसत आहेत. ठिकठाणी पोलिसांची वाहने, तसेच सरकारी कार्यालयांना आगी लावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांकडून रस्ते, पूल बंद केले जात आहेत. त्यामुळे पीओकेमध्ये सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.