
Tejashwi Yadav Emerges as Top Choice for Bihar CM : भारतीय निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीत मित्रपक्षांची समजूत काढत जागावाटप अंतिम करण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून निवडणुकीसाठी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या असून काहींची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बिहारमधील तब्बल 75 लाख महिलांना दरमहा दहा हजार रुपये मिळतील, अशा योजनाचेचा शुभारंभ केला आहे. या योजनेमुळे महिला एनडीएच्या मागे उभ्या राहतील, अशी नेत्यांना आशा आहे. पण एका ताज्या सर्व्हेने भाजपसह नितीश कुमार यांना झटका बसला आहे. सी-व्होटरने हा सर्व्हे केला आहे.
ताज्या सर्व्हेनुसार बिहारमधील मतदारांची मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती तेजस्वी यादव यांना आहे. सर्व्हमध्ये सहभागी झालेल्या मतदारांपैकी 35 टक्के मतदारांनी तेजस्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर दुसरीकडे नितीश कुमार यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचेही सर्व्हेतील आकडेवारीतून दिसते.
नितीश कुमार हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना केवळ 16 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच्या सर्व्हेमध्ये ते दुसऱ्या स्थानावर होते. तेजस्वी यादव यांनी पहिले स्थान कायम राखले आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील सर्व्हेच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता 5 टक्क्यांनी कमी झाली आहे.
ताज्या सर्व्हेमध्ये मोठा उलटफेर दिसून आला आहे. जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांना 23 मतदारांनी पसंती दिली आहे. फेब्रुवारीमध्ये हा आकडा केवळ 14 टक्के एवढा होता. तर नितीश कुमार यांची लोकप्रियता 2 टक्क्यांनी घसरली आहे. सी-वोटरच्या या आकडेवारीमुळे नितीश कुमार यांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, बिहारमध्ये इंडिया आघाडीकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याची घोषणा करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय जनता दलाकडून तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण काँग्रेसने अद्याप त्याला हिरवा कंदील दाखवलेला नाही. एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याबाबत भाजपमध्ये खदखद आहे. भाजपला अधिक जागा मिळाल्यास मुख्यमंत्री भाजपचाच असायला हवा, असा एक पक्षांतर्गत प्रवाह आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून वाद धुमसतच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.