Security forces clashing with protesters during massive unrest in Pakistan-Occupied Kashmir (POK). Sarkarnama
देश

POK Protest update : पाकव्याप्त काश्मीर पेटलं, लष्कराच्या नाकीनऊ; राजनाथ सिंह यांचं विधान खरं ठरणार?

POK Protests Escalate Over Government Failures : सुरक्षा दलाने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि जदयालमध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये तीन पोलीस कर्मचारीही मृत्यूमुखी पडले आहेत.

Rajanand More

POK civilian killings : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरबाबत एक महत्वाचं विधान केलं होतं. ते विधान खरं ठरणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्याला पाकव्याप्त काश्मीरमधील सध्याची भयानक स्थिती कारणीभूत ठरत आहे. या भागातील जनता आणि पाकिस्तानी लष्कर, पोलीस आमनसामने उभे ठाकले असून दररोज हिंसा होत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या हिंसाचारामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच पाकव्याप्त काश्मीरमधील स्थिती हिंसक बनली आहे. आंदोलकांच्या 38 महत्वाच्या मागण्या मान्य करण्यास सरकार अपयशी ठरल्याने येथील नागरिक भडकल्याचे चित्र आहे. आजचा आंदोलनचा तिसरा दिवस आहे.

प्रामुख्याने ददयाल या भागात मोठे आंदोलन भडकले आहे. सरकारने सुरक्षा दलाचे हजारो जवान या भागात तैनात केले आहेत. त्याचप्रमाणे मुझफ्फराबाद, रावलकोट, नीलम व्हॅली आणि कोटली या भागातही आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांना आवरताना सुरक्षा दलाच्या नाकीनऊ येताना दिसत आहे.

सुरक्षा दलाने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि जदयालमध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये तीन पोलीस कर्मचारीही मृत्यूमुखी पडले आहेत. तर 200 हून अधिक नागिरक जखमी झाले आहे. त्यापैकी अनेक जण पोलिसांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरीतांसांठी पीओकेमध्ये राखीव 12 विधानसभा जागा रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे करातून सवलत, वीजेवर अनुदान, विविध रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे, अशा मागण्या केल्या जात आहेत.

आंदोलनामुळे 29 सप्टेंबरपासून बाजार, दुकाने, स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतेक व्यवसाय बंद आहेत. मोबाईल इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही जवळपास ठप्प आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आंदोलनाची अनेक दृश्ये सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यावरून आंदोलनाची तीव्रता समोर आली आहे.

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यावर असताना राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल, असे विधान केले होते. त्या भागात राहणाऱ्या लोकांमधून आता ही मागणी होत असल्याचेही ते म्हणाले होते. यावेळी त्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या काश्मीरमधील एका भाषणाचीही आठवण सांगितली होती. एक दिवस पीओके स्वत:च मी सुध्दा भारत आहे, असे म्हणेल. तो दिवस आता दूर नसल्याचे राजनाथ सिंह त्यावेळी म्हणाले होते. हे भाषण आणि सध्या पीओकेमध्ये सुरू असलेल्या स्थितीचे कनेक्शन जोडले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT