Nilesh Ghaiwal News : निलेश घायवळचा निवडणूक आयोगालाही चुना; पती-पत्नीची कोथरूडसह कर्जत-जामखेडमध्ये ‘मतचोरी’...

Nilesh Ghaiwal Accused of Misleading Election Commission : विजय कुंभार यांनी सोशल मीडियात याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, घायवळ याने नावामध्ये बदल करून पुण्यात कोथरूड मतदारसंघात तर अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी केली आहे.
Duplicate voter registration in Kothrud and Karjat-Jamkhed linked to Nilesh Ghaiwal.
Duplicate voter registration in Kothrud and Karjat-Jamkhed linked to Nilesh Ghaiwal.Sarkarnama
Published on
Updated on

Duplicate Voter Registration in Kothrud and Karjat-Jamkhed : गुंड निलेश घायवळने बोगस पत्ता देत पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्याला हा पासपोर्ट कसा मिळाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चाही आहे. त्यातच आता घायवळचा आणखी एक ‘घोळ’ समोर आला आहे. त्याने थेट भारतीय निवडणूक आयोगालाही चुना लावला आहे.

निलेश घायवळ या मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनगावचा. त्याने पुण्यात गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व निर्माण केले. विविध गंभीर गुन्ह्यांसाठी पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता पुण्यासह अहिल्यानगरमध्येही त्याने मतदार नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी निलेश घायवळसह त्याच्या पत्नीच्या मतदार नोंदणीची संपूर्ण माहितीच समोर आणली आहे.

विजय कुंभार यांनी सोशल मीडियात याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, घायवळ याने नावामध्ये बदल करून पुण्यात कोथरूड मतदारसंघात तर अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी केली आहे. तसेच दोन्ही ठिकाणी त्याच्या वयामध्ये एक वर्षाचे अंतर आहे. पत्नी स्वाती हिचीही मतदार म्हणून दोन्ही मतदारसंघात नोंदणी असल्याचे समोर आले आहे.

Duplicate voter registration in Kothrud and Karjat-Jamkhed linked to Nilesh Ghaiwal.
Maharashtra Government : फडणवीस सरकार रेकॉर्ड करणार; एकाच दिवशी तब्बल 10,309 नियुक्त्या...

कोथरूडमध्ये निलेशकुमार गायवळ तर कर्जत-जामखेडमध्ये निलेश गायवळ असा बदल त्याने केला आहे. आडनावाच्या स्पेलिंगमध्येही त्याने बदल करत निवडणूक आयोगाला गंडवलं आहे. हे स्पष्टपणे मतदान नोंदणीमध्ये फेरफार केल्याचे दिसत असल्याचे विजय कुंभार यांनी म्हटले आहे. जर एखादे कुटुंब असे तर असेल तर अशाप्रकार बोगस मतदार किती असू शकतात, अशी भीतीही कुंभार यांनी व्यक्त केली आहे.

Duplicate voter registration in Kothrud and Karjat-Jamkhed linked to Nilesh Ghaiwal.
Lal Bahadur Shastri Birth Anniversary : ना कोणता बडेजाव, ना पदाचा मोह..! सायकलवर बाजारात जाणारे पंतप्रधान...

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत मतचोरीवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. एकाच मतदाराची विविध मतदारसंघात नोंदणी असल्याचे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिले होते. एकच मतदार विविध मतदारसंघात मतदान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ते सातत्याने कथित मतचोरीचा आरोप करत आहेत. यापार्श्वभूमीवर घायवळ कुटुंबाची चलाखीही समोर आली आहे. यालाही आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com