Sexual Assault sarkarnama
देश

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी PSI ला अटक, पोलीस विभागात एकच खळबळ; अटकेनंतर थेट...

Karnataka PSI Arrested in Minor Girl Sexual Assault Case : कर्नाटकातील राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून एका पोलीस उपनिरीक्षकानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. यामुळे आता पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Karnataka Crime News : पोलीस खात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका पोलीस उपनिरीक्षकानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही घटना कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात घडली असून नराधम PSI ला लैंगिक छळाच्या आरोपाखाली पोक्सो कायद्यातंर्गत अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल होताच PSI ला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता कर्नाटकात गेल्या काही दिवसांत पोलीस खात्याला काळिमा फासणारी ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने 4 जुलै रोजी भटकळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने पीएसआय अभिनंदन याने आपल्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. पीएसआय अभिनंदन याने तिला फसवून आपल्या एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला होता. तेथे वाढदिवसाच्या पार्टी होती. या पार्टीनंतर त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या अत्याचारानंतर पीएसआय अभिनंदन याने सातत्याने तिच्या मोबाईलवर संपर्क साधून तिला त्रास देत होता, असाही आरोप पीडितेने केला आहे. या तक्रारीनंतर आता आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तातडीने त्याला निलंबित केले आहे.

या प्रकरणात पोलीस प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगवान केला आहे. पोलीसांनी संबंधित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले ताब्यात घेतले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील पीडितेने केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे आढळले असून पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकारी त्याची सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान गेल्या महिन्यात अमृतहळ्ळी पोलीस ठाण्यातील अशीच घटना उघडकीस आली होती. येथे पोलीस उपनिरीक्षकाने चौकशीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केला होता. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणातील आरोपी पीएसआय प्रवीण याने मुलांना एका लॉजमध्ये नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच अत्याचाराचे मोबाईलवर रेकॉर्डींग केले. मात्र हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा भांडा फोड झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT