Crime News : एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाला महिला डॉक्टर, नर्सला मारहाण भोवणार, 'तो' व्हिडिओही आला समोर! गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Corporator Ramesh Mhatre KDMC : नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, अन्य एका डॉक्टर आणि तीन महिला नर्स यांच्याशी धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Corporator Ramesh Mhatre has been accused of assaulting a doctor and a nurse at a hospital. The incident has sparked demands for strict action.
Corporator Ramesh Mhatre has been accused of assaulting a doctor and a nurse at a hospital. The incident has sparked demands for strict action.sarkarnama
Published on
Updated on

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर, अन्य एका डॉक्टर तसेच तीन महिला नर्स यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. डाॅक्टरांना मारहाण करण्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. त्यामध्ये नर्स, डाॅक्टरला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर नवजात बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता भासू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी संबंधित कुटुंबीयांना दिली. मात्र, त्या वेळी रुग्णालयातील एनआयसीयूचे सर्व बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

या वादानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, अन्य एका डॉक्टर आणि तीन महिला नर्स यांच्याशी धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला आहे. घटनेदरम्यान सुरक्षा रक्षकांनाही कार्यकर्त्यांनी रोखून धरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Corporator Ramesh Mhatre has been accused of assaulting a doctor and a nurse at a hospital. The incident has sparked demands for strict action.
Devendra Fadnavis : नाशिकच्या घटनेनं डोळे उघडले, CM फडणवीस आता महिला आमदारांची टीम उतरवणार मैदानात

घटनेनंतर रुग्णालयातील अनेक परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. आम्ही रुग्णसेवा करायची की असे हल्ले सहन करत राहयचे. वारंवार वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला.

या संदर्भात मुख्य आरोग्य अधिकारी सादिया पिंजारी यांनी घटनेची माहिती देत संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा व्यवस्था वाढवणार

या घटनेमुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. डॉक्टर आणि परिचारिकांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Corporator Ramesh Mhatre has been accused of assaulting a doctor and a nurse at a hospital. The incident has sparked demands for strict action.
Ketan Agarwal: सियाचे वडील ICUमध्ये; आई म्हणाली, ‘तिलाही लोहगडावरून ढकलून द्या’! चेतन चौधरीचा कर्मचारी बनणार माफीचा साक्षीदार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com