Crime News : एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाची महिला डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात घुसून धुडगूस

shinde Shivsena Corporator Accused of Assaulting Woman Doctor and Nurses in Dombivli : डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालत डॉक्टर आणि नर्सवरील हल्ला केल्याची घटना घडली आहे.
KDMC Hospital Staff Protest After Alleged Assault by Corporator Ramesh Mhatre
KDMC Hospital Staff Protest After Alleged Assault by Corporator Ramesh Mhatresarkarnama
Published on
Updated on

Dombivli KDMC Hospital Violence News : रुग्णालयात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी मुजोरी करत थेट डॉक्टर आणि परिचारिका हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घडली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून महिला डॉक्टरसह सहा जणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारानंतर आता "आमच्यावर आणखी किती अन्याय करणार?" अशी संतप्त भावना रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिला डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबियांना पूर्वकल्पना देत, जन्मानंतर बाळाला नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवावे लागण्याची शक्यता व्यक्त केली.

तसेच, रुग्णालयातील एनआयसीयू विभागात बेड उपलब्ध नसल्याची माहिती देत संबंधित महिलेला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घातला. तसेच याची माहिती नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले.

KDMC Hospital Staff Protest After Alleged Assault by Corporator Ramesh Mhatre
Crime news : निवृत्त महिला IAS अधिकाऱ्याच्या लेकाचा प्रताप; विधवा महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण, स्थानिकांनी चोप देत घडविली अद्दल...

नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टरसह सहा जणांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, या घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी पकडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

KDMC Hospital Staff Protest After Alleged Assault by Corporator Ramesh Mhatre
Crime News : शिवसेना जिल्हाप्रमुखाचा मध्यरात्री गोळीबार; जमिनीचा वाद, दोघांना अटक

या धक्कादायक घटनेनंतर हॉस्पिटलमधील नर्स आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले असून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com