Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Political Party Offices: लोकसभेकडून शिंदे - ठाकरेंना मिळालं दालन; पवारांच्या पक्षाला मात्र 'वेट अँड वॉच'

Lok Sabha News : देशातील अनेक राजकीय पक्षांना संसदभवन परिसरातील कार्यालयांचं वाटप करण्यात आले. यामध्ये प्रादेशिक पक्षांना मोठी लॉटरी लागली आहे तर काही पक्षांच्या पदरी निराशा आली आहे

Deepak Kulkarni

New Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. आता आपली तिसरी टर्म एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन गाजवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन टर्मसारखाच पुन्हा एकदा कामाचा धडाका लावला आहेत.

तर दुसरीकडे तब्बल दहा वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षाचा आवाज वाढला आहे. इंडिया आघाडीने 225 वर जागा मिळवत जोरदार कमबॅक केले आहे. आता लोकसभेकडून राजकीय पक्षांना दालनांचा वाटप करण्यात आले आहे.

लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे बुधवारी (ता.११) वाटप करण्यात आले.यात एकनाथ शिंदेंना शिवसेना (Shivsena) पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त ‘शिवसेना’म्हणून केला जावा, यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असतात.

त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख ‘शिवसेना (शिंदे)’ असा करण्यात आला आहे.शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात 128 क्रमांकाचे दालन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 128 A हे दालन देण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीला 118 B,बिजू जनता दल 45, तेलगू देसम पार्टी F09, राष्ट्रवादी काँग्रेस 126 D,समाजवादी पार्टी 130 - 126, राष्ट्रीय जनता दल 125 यांसह इतर पक्षांनाही लोकसभा सचिवालयाकडून दालनांचे वाटप करण्यात आले आहे.

देशातील अनेक राजकीय पक्षांना संसदभवन परिसरातील कार्यालयांचं वाटप करण्यात आले. यामध्ये प्रादेशिक पक्षांना मोठी लॉटरी लागली आहे तर काही पक्षांच्या पदरी निराशा आली आहे. लोकसभा निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी करत आठ जागा जिंकलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मात्र संसद भवनातील कार्यालय मिळालेले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे शरद पवार गटापेक्षा मी खासदार निवडून आलेल्या पक्षांनाही कार्यालयांचं वाटप करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT