NCP Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar NCP : संसदेतले कार्यालय शरद पवार गटालाच लोकसभा सचिवालयाने काढले नवे पत्रक

Sachin Waghmare

New Delhi News: लोकसभा निवडणूक निकालानंतर पीएम मोदींनी सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत बाजी मारली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला लोकसभेत पूर्वीच्या तुलनेत चांगल्या जागा मिळाल्या आहेत. लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव देताना एक चूक केली होती. ती झालेली चूक दुरुस्त करीत शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा केला आहे.

खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडेच आहे तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला मात्र कार्यालय मिळाले नाही. लोकसभा सचिवालयाने याबाबत गुरुवारी नवे पत्रक काढले आहे. त्यामध्ये कार्यालयाचे वाटप करताना केलेली चूक दुरुस्त केली आहे. ( Political Party Offices news) News

अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तर तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. पण, तरीही शरद पवार गटाने लोकसभेत 8 जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच आहे तर अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय मिळाले नाही.

अजित पवार गटाला कार्यालयच नाही

लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले. खासदार संख्येच्या आधारे हे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा उल्लेख करत कार्यालय देण्यात आले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तर कार्यालयही देण्यात आलेले नाही.

लोकसभा सचिवालयाने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील कार्यालयाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करीत त्यांना कार्यालय देण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नऊ खासदार असलेल्या उद्धव ठाकरे गटाना लोकसभा सचिवालयाकडून स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे.

दरम्यान, दोन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यावेळी बंडखोरी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले होते. केंद्रीय निवडणूक आय़ोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला मूळ शिवसेना सांगितले आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांना दिले. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत महायुतीत आले.

एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवारांनीही पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं. मात्र, लोकसभेच्या निकालात या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान सहन करावं लागले आहे. लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक होता. तर, याउलट शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT