Prajwal Revanna  Sarkarnama
देश

Prajwal Revanna Arrest News Updates: प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी; तुरुंगातच लागणार 'खासदार'कीचा निकाल

Deepak Kulkarni

Prajwal Revanna Case: माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि भाजपचे पक्षातून निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णाला 35 दिवसांनी अटक केली आहे.जर्मनीहून बंगळुरू विमानतळावर उतरताच त्याला कर्नाटक 'एसआयटी'नं रेवण्णाला ताब्यात घेतलं.प्रज्ज्वल हा 27 एप्रिलला बंगळुरूहून जर्मनीला पळून गेला होता.आता त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भाजप पक्षातून निलंबित केलेले हसन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णाला अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने रेवण्णाला आता न्यायालयाने पोलिस कोठडी शिक्षा ठोठावली आहे.

प्रज्ज्वल रेवण्णाविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 3 बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. यासह रेवण्णाचे महिलांसोबत 2500 अश्लील व्हिडीओ असल्याचा दावाही केला जात आहे.

जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णांनी (Prajwal Revanna) एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले की, ' जेव्हा 26 एप्रिल रोजी निवडणूक झाली, तेव्हा माझ्याविरोधात कोणतेही प्रकरण नव्हते आणि कोणतीही SIT बनली नव्हती, माझा परदेश दौरा नियोजित होता. मला आरोपांबाबत तेव्हा समजले, जेव्हा मी माझ्या प्रवासात होतो.'

राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि अनेक अन्य काँग्रेस नेत्यांनी याबाबत व माझ्याविरोधात बोलणं सुरू केले. माझ्याविरोधात एक राजकीय षडयंत्र रचलं गेलं. शुक्रवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता मी एसआयटी समोर हजर होवून, तपासाशी निगडीत सर्व माहिती देईन. मी तपासात सहकार्य करेन, माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे.' असं रेवण्णांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT