Prajwal Revanna Arrested : 2500 व्हिडीओ, 3 गुन्हे अन् 35 दिवस लपाछपी; अखेर प्रज्ज्वल रेवण्णाला अटक

Prajwal Revanna News : हासन मतदारसंघातून निवडून आलेले प्रज्ज्वल रेवण्णा यांना निलंबित करण्यात आलं आहे. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर रेवण्णा जर्मनीला पळून गेला होता.
Prajwal Revanna
Prajwal Revannasarkarnama
Published on
Updated on

Prajwal Revanna Arrest News, 31 May : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा ( former prime minister HD Deve Gowda ) यांचे नातू, पक्षातून निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला 35 दिवसांनी अटक केली आहे. जर्मनीहून बंगळुरू एअरपोर्टवर विमान उतरताच काही मिनिटांमध्ये कर्नाटक 'एसआयटी'नं प्रज्ज्वल रेवण्णाला ताब्यात घेतलं. प्रज्ज्वल रेवण्णा 27 एप्रिलला बंगळुरूतून जर्मनीला पळून गेला होता.

विमानातून उतरताच रेवण्णाला महिला पोलिसांची एक टीम 'सीआयडी' ऑफिसला घेऊन गेली. त्यानंतर रात्रभर तिथेच त्याला ठेवण्यात आलं. रेवण्णाचे दोन सुटकेसही 'एसआयटी'नं जप्त केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुक्रवारी रेवण्णाला सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात येईल. अटकेपासून 24 तासांच्या आतमध्ये त्याला न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी रेवण्णाच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. 'एसआयटी' रेवण्णाला 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करू शकते. पण, न्यायालय सात ते 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची शक्यता आहे.

Prajwal Revanna
RJD Bihar Politics : नितीशकुमार, उपेंद्र यादव अन् चिराग पासवान यांच्याबाबत 'RJD'चा मोठा दावा!

यासह फॉरेन्सिक टीम रेवण्णाचे ऑडिओ सॅम्पल घेणार आहे. ज्यातून व्हायरल व्हिडीओमधील आवाज रेवण्णाचा आहे की नाही, याची माहिती मिळेल.

नेमकं प्रकरण काय?

प्रज्ज्वल रेवण्णाविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 3 बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. यासह रेवण्णाचे महिलांसोबत 2500 अश्लील व्हिडीओ असल्याचा दावाही केला जात आहे.

Prajwal Revanna
Rahul Gandhi : प्रचार संपताच राहुल गांधींचं ट्विट, सांगितला लोकसभेचा निकाल; मोदींनाही काढला चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com